बल्लारपूर येथे रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न

0
657

बल्लारपूर येथे रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न

( प्रा.महेंद्र बेताल,प्रतिनिधी)
दि.16 /02/2021 ला बल्लारपूर पोलिस विभागाअंतर्गत अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणीव जाग्रुती व्हावी म्हणून पोलिस विभागा मार्फत रस्ता सुरक्षा सप्ताह घेण्यात आला.झालेल्या निबंध स्पर्धा ज्यात आपण पाहिलेला अपघात व वाहतूकीचे नियम व नागरिकांचे कर्तव्य ह्या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये मोहसिन भाईजवेरी हायस्कूल बल्लारपूर, जनता विद्यालय बल्लारपूर, बालाजी हायस्कूल बामणी ,दिलासा ग्राम कान्वेंट बल्लारपूर, महात्मा ज्योतिबा हायस्कूल बल्लारपूर येथील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला असता त्यामधून प्रथम क्रमांक महानुर बलविर माली दीलासा ग्राम कान्वेंट वर्ग 9वा द्वितीय बक्षीस कुमारी दीक्षा बंडू रामटेके ,मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय बल्लारपूर तृतीय बक्षीस कुमारी हर्षा रमेश मोहितकर बालाजी हायस्कूल बामणी वर्ग दावा त्याचप्रमाणे प्रोत्साहन बक्षीस कुमारी प्राजक्ता रंजन बोबडे दिलासा ग्राम कानवेट बल्लारशा वर्ग9वा तनुश्री सतीश पाटील दिलासा ग्राम कानवेट बल्लारशा कुमारी बुशरा अनम शेख शकूर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय बल्लारपूर यांना प्रशिस्त पत्र व शील देऊन माननीय पोलीस निरीक्षक उमेश पाटील साहेब ठाणेदार बल्लारशा यांच्या हस्ते बक्षीस देऊन सर्वांना गौरवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here