कडधान्यांच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन किमतीवर परिणाम 

0
428
कडधान्यांच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन किमतीवर परिणाम 
 
खासदार बाळू धानोरकर यांच्या लोकसभेत अतारांकित प्रश्न 
चंद्रपूर : कडधान्यांच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन किंमतीवर घातक परिणाम होत असल्या कडे सरकारचे लक्ष आहे काय ? असा प्रश्न डाळींच्या निशुल्क आयाती संदर्भात खा.बाळू धानोरकर यांनी लोकसभेत विचारला.  डाळीच्या निशुल्क आयातीमुळे डाळ उत्पादक किमती घसरून शेतकरी आर्थिक संकटात येऊ शकतात याकडे खा.बाळू धानोरकर यांनी लक्ष वेधले.

देशांतर्गत उपलब्धता वाढविण्यासाठी व कडधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आयात धोरणात बदल करण्यात आले असल्याचे उत्तर केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी खा.धानोरकर यांचे प्रश्नाचे उत्तरादाखल दिले.
डाळींची(Pulses) आयात सुरू झाल्यामुळे शेतकरी त्यांच्या घटणाऱ्या संभाव्य उत्पन्नच्या चिंतेत आहेत. केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की, या निर्णयामुळे भारतातील शेतकऱ्यांवर याचा परिणाम होणार नाही. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने डाळीवरील वाढती किंमत रोखण्यासाठी तूर, मूग व उडीद आयात सुरू केली. सरकारच्या या घोषणेनंतर तीन डाळींच्या किंमती खाली येण्यास सुरूवात झाली आहे. घसरलेल्या किंमती आणि नि: शुल्क आयातीबाबत शेतकरी चिंतेत आहेत, कारण त्यांना असे वाटते की त्याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होईल.त्यासाठी शासनाने विचार करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here