धनराज दुर्योधन राज्यस्तरीय प्रश्नोत्तरी स्पर्धेत प्रथम

0
559

धनराज दुर्योधन राज्यस्तरीय प्रश्नोत्तरी स्पर्धेत प्रथम

अमोल राऊत

राजुरा(चंद्रपूर) :विद्यार्थ्यांना देशहितासाठी व जनसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणा-या राष्ट्रनेत्याचे जीवनकार्य व साहित्यनिर्मिती वाचण्यास प्रवृत्त करुन त्यांचे ज्ञान वृद्धिगंत करुन देण्याच्या उद्देशाने बहुजन क्रांती साहित्य समुह,नाशिक यांच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ,क्रांतीसूर्य म.ज्योतिबा फुले,चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यावर आधारित आॅनलाइन राज्यस्तरीय प्रश्नोत्तरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या प्रश्नोत्तरी स्पर्धेत धनराज रघुनाथ दुर्योधन यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकानी या स्पर्धेत भाग घेतला.सर्व स्पर्धकाना प्रमाणपत्र देण्यात आली.बहुजन क्रांती समुहाच्या प्रशासिका तेजस्विनी संसारे व त्यांच्या टिमनी विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.धनराज दुर्योधन यांनी राज्यस्तरीय विविध स्पर्धेत प्रथम,द्वितिय,तृतिय क्रमांकाचे अनेक बक्षिस मिळविले आहे.याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here