‘सचित्र संविधान’ सर्वांपर्यंत पोहचविण्याचा परमानंद तिराणिक यांचा उपक्रम…

0
409

‘सचित्र संविधान’ सर्वांपर्यंत पोहचविण्याचा परमानंद तिराणिक यांचा उपक्रम…

विकास खोब्रागडे

एकमेकांची ख्यालीखुशाली विचारणारी, वतनहून संदेशा आणणारी पत्रे बंद झालेली असताना अचानकपणे पोस्टकार्डला अच्छे दिन आले आहेत .एरवी ,पोस्टकार्डची विक्री फारशी होत नसे.पण या लाॕकडाऊनच्या काळामध्ये अनेक कल्पनाशक्ती उदयास येवून या पोस्टकार्डचा वापर ‘ सचित्र संविधानाची उद्देशिका ‘लिहीण्यासाठी व ती सर्वांपर्यंत कशी पोहचविता येईल याचा प्रयत्न परमानंद तिराणिक यांनी केला आहे.

कधी कुणाचे चांगले दिवस येतील ,काही सांगता येत नाही. ई-मेल,फेसबुकच्या मेसेजच्या काळात पोस्टकार्ड तसा कालबाह्य ठरणारा ,काही दिवसापुर्वीपर्यंत मेडिकल स्टोअरमधील सॕनिटायजर धुळखात पडलेले असायचे .पण ,करोनारुपी महामारीमुळे या सॕनिटायजरचे नशीबच फळफळले आणि कोपऱ्यातली बाटली चटकन पुढल्या काउंटरवर आली. तसेच काही राजकीय पक्षांनी सुध्दा विविध आंदोलनासाठी काही काळ पोस्टकार्डचा वापर केला होता परंतू त्या पोस्टकार्डचा विधायक असा वापर आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीने केला असे अजूनही एकीवात नाही.नेमकी हिच संधी साधुन परमानंद तिराणिक यांनी लाखो पोस्टकार्डवर ‘ सचित्र संविधानाची उद्देशिका’ स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात लिहून ग्रामीण भागात पोहोचविण्याचा एक आगळा – वेगळा उपक्रम राबविला आहे.

भारताचे संविधानाची उद्देशिका हे सर्वप्रथम महाराष्ट्रात २००८ पासून वर्ग १ली ते वर्ग १२ वी पर्यंत प्रत्येक विषयाच्या शालेय अभ्यासक्रम पुस्तीकेत मुखपृष्ठाच्या आतिल पान नंबर दोनवर दिल्या गेली आहे.महाराष्ट् राज्याचे माजी शालेय शिक्षणमंञी प्रा.वसंतराव पुरके यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ,पुणे बालभारती या शैक्षणिक संस्थेने या ‘ संविधान उद्देशिकाची ‘ दखल घेवून अधोरेखित केली गेली. तर ,देशात २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा ‘ संविधान दिवस ‘ म्हणून शासकीय स्तरावर साजरा करण्यात येतो.मात्र ते संविधान निव्वळ २६ नोव्हेंबर या दिवसापुरतेच न मर्यादित वाचन करता वर्षेभरही याची जनजागृती व्हावी म्हणून पोस्टकार्डच्या माध्यमातून सर्वांना संविधानाचे महत्त्व कळावे व त्यात काय लिहिल्या गेले आहे व तेथील भारतीय संविधानामध्ये जी चित्रे आहेत ती सजावटीसाठी नाहीत .त्यातून भारतीय आदर्श आणि मुल्ये प्रतिबिंबित होतात .त्यांची रचना जाणीवपूर्वक करण्यात आली असून , सचित्र संविधान सर्वांपर्यंत पोहचायला हवे.असे प्रतिपादन आदिवासी कला संवर्धन समितीचे जिल्हा अध्यक्ष परमानंद तिराणिक यांनी केले आहे.

संविधानाच्या एकूण २२ भागांमध्ये २८ चित्रे प्रसिध्द चित्रकार नंदलाल बोस आणि त्यांच्या चमूने विचारपूर्वक तयार केली आहेत.काही प्रकरणात एक तर काही भागांमध्ये दोन चित्रे आहेत .संविधानामध्ये गंगावतरण,अश्वमेध घोडा,तथागत बुध्द,भगवान महावीर ,छञपती शिवाजी महाराज ,गुरु गोविंदसिंग,झाशीची राणी लक्ष्मीबाई ,महात्मा गांधी ,सुभाषचंद्र बोस या महापुरुषांची पण चित्रे आहेत ती चित्रे म्हणजे त्या व्यक्तीने जो आदर्श प्रस्थापित केला तो आदर्श सांगण्याचा एक भाग आहे.म्हणून हे संविधान प्रत्येकांच्या घरी असणे महत्त्वाचे आहे.यासाठीच लाखो पोस्टकार्डमधून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रयत्न…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here