‘सहजं सुचलं’ महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणारं एक व्यासपीठ – कवयित्री स्मिता बांडगे
प्रविण मेश्राम
सहज सुचलं गृप म्हणजे महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणारं एक व्यासपीठ असुन महिलांच्या अंगी असणारे कला गुणांना अचूक हेरून त्यांना प्रोत्साहन देणारा हा ग्रुप आहे. यामुळे निश्चिंतच महिलां व युवतींचाआत्मविश्वास वाढतो. प्रत्येकाच्या अंगी काहीना काही कला गुण कौशल्ये असतात. त्या कला गुणाचा आदर करून महिलांना पुढे नेऊन त्यांची प्रगती होण्याचे काम या गृपमधून सुरु आहे व ते सदैव सुरु राहणार यात तिळमात्र शंका नाही असे मनाेगत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल येथील सुपरिचित कवयित्रि स्मिता बांडगे यांनी आज व्यक्त केले. त्यांनी या ग्रुपच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,मेघा धोटे तदवतंच मुख्य संयाेजिका सुविद्या बांबोडे, सारीका खाेब्रागडे, उज्वला यमावार, सराेज हिवरे वअन्य महिलांचे महत्वाचे योगदान असल्याचे म्हटले आहे. विशेषता व्यासपीठाची धुरा सांभाळणां-या नागपूरच्या प्रभा अगडे यांचा देखिल सिंहाचा वाटा असल्याचा उल्लेख करीत त्यांनी ग्रुपच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. सहजं सुचलच्या तेलंगणा येथील छाेट्या राणी राेहनेच्या कार्याचीही बांडगे यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
