समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत विकासाची गंगा पोहचवणे हे महाआघाडीचे मुख्य काम : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

0
431

समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत विकासाची गंगा पोहचवणे हे महाआघाडीचे मुख्य काम : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 

संगमनेर/अहमदनगर, ज्ञानेश्वर गायकर पाटील (५ नोव्हे.) – सर्व सामान्य नागरिक हा देशाच्या अर्थकणा मानून महा विकास आघाडी राज्यात काम करत आहे. म्हणूनच विकासकामा करिता भरघोस निधी देत आहोत, त्याचा योग्य वापर करा, सर्व सामान्य माणूस व समाजातील अंतिम घटक याचा लाभार्थी झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी केले.

या वेळी व्यासपीठावर आमदार डॉक्टर सुधीर तांबे, प्रसिद्ध उद्योगपती व समासेवक राजेश मालपाणी, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉक्टर जयश्री थोरात ,महाराष्ट्र युवक चे अध्यक्ष ,युवा नेते सत्यजित तांबे, दिलीप पुंड, नामदेवराव गुंजाळ , उप विभागीय अधिकारी मंगरुळे, तहसीलदार निकम यांच्या सह नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर वाघ, सार्वजनिक बांधकाम विभाग चे आर आर पाटील, सतीश पाटील सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.

“मी शिदा देती, तुम्ही स्वयंपाक करा, व ही शिदोरी शेवटच्या घटका पर्यंत पोहचवा “असा सल्ला थोरात यांनी या वेळी दिला.गरीब माणसाचे जीवनमान सुधारण्यासाठी व उंचवण्याकरिता प्रयत्नाची परिकष्टा करा, अंतिम घटका पर्यंत जाऊन शासकीय योजनाचा लाभ वंचित , गरजू पर्यंत गेला पाहिजे असे प्रतिपादन ही त्यांनी केले.

संगमनेर चा व्यापारी प्रामाणिक आहे, धंद्यात प्रामाणिक प्रयत्न महत्वाचे आहेत, म्हणूनच संगमनेर ची बाजार पेठ फुललेली आहे, अन् हेच संगमनेर चे वैभव आहे असे ही ते म्हणाले.संगमनेर च्या वैभवात अनेक कामे झाली, राज्यात कुठ ही नाही असे बस स्थानक, अत्यंत आदर्श अशी न्यायालय इमारत, भव्य प्रशासकीय कार्यालये याचा ही त्यांनी अवृजून उल्लेख केला.संगमनेर मध्ये धुळीचे रस्ते व पार्किंग ची सोय या नागरिकांना भेडसावणाऱ्या मुख्य बाबी असून संगमनेर नाशिक रुंदीकरण केल्याने या बाबी काही प्रमाणात निकाली निघतील असे ही ते म्हणाले.

संगमनेर शहरातील भुयारी गटार योजना, रस्त्यांचे डांबरीकरण , गल्ली बोळात काँक्रिट करणं , स्वच्छ्ता पुरस्कार आदी बाबत दुर्गा तांबे व त्यांचे सहकारी अभिनंदनास पात्र असल्याचे ही त्यांनी नमूद केले.स्वयंपूर्ण संगमनेर हे आपले स्वप्न असल्याचे ते पुढे म्हणाले.

या वेळी बार कौन्सिल करिता १२ गुंठे जमीन हस्तरान चे पत्र अध्यक्ष ॲड सुहास आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले.

म्हाळुंगी सह इतर नद्यांचे शोभिकरण प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असा विश्वास नगराधक्ष दुर्गा ताई तांबे यांनी केला, भूतपूर्व मुख्याधिकारी सचिन बांगर यांचा ही त्यांनी चांगला अधिकारी असा उल्लेख केला संगमनेर चा पाणी प्रश्न निकालात निघाला, तसा इतर विकासाचा प्रश्न ही निकालात निघेल असे प्रतिपादन डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले.

बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना विशेष धन्यवाद दिले. शहरातील विविध विकास कामे यांचा शुभारंभ प्रसंगी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, शासकीय अधिकारी गर्दी वर नियंत्रण मिळवण्या करिता नागरिकांना प्रबोधन करत होते. डॉक्टर सुधीर तांबे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here