संविधान सन्मान रॅलीने दुमदुमली कोठारी नगरी

0
545

संविधान सन्मान रॅलीने दुमदुमली कोठारी नगरी

 

कोठारी, राज जुनघरे
भिम आर्मी, भारतीय एकता मिशन संघटना, उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, व बौद्ध समाजाच्या संयुक्त विद्यमाने ७१ वा संविधान संन्मान दिन कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात संविधान चौकात उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाला ठाणेदार तुषार चव्हाण, बौद्ध समाज अध्यक्ष राजकुमार परेकर, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल कातकर, युवराज तोडे, वंदना झाडे,यांची प्रमुख उपस्थिती होती. भिम आर्मी च्या वतीने संविधान संन्मान रैलीचे आयोजन जिल्हा सचिव राज जुनघरे, तालुका सचिव संदिप मावलीकर, तालूका उपाध्यक्ष अनिल वनकर,व स्थानिक अध्यक्ष प्रमोद कातकर यांचे नेतृत्वात करण्यात आले होते. भिम आर्मी च्या संविधान संन्मान रैलीने अवघी कोठारी नगरी दुमदुमली होती.युवावरगात उत्साह संचारला होता. उपस्थित पाहुण्यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुर्णा कृती पुतळ्यास माल्यारपण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आणि बुद्ध वंदना घेण्यात आली. नितीन रायपुरे यांनी सविधानाचे महत्त्व पटवून देत संविधान प्रस्तावनेचे वाचन केले. आभार राजकुमार परेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल गेडाम, शुभम खोब्रागडे, भारत खोब्रागडे, प्रफुल साखरकर, चेतन वासनिक, अजय देवगडे, आकाश कांबळे, यांचे समवेत भिम आर्मी च्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. बौद्ध समाजाचे महिला या वेळी आवर्जून उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here