आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विकासकामांचे भुमिपूजन

223

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विकासकामांचे भुमिपूजन

आमदार निधीतून वेंडली येथे समाजभवन तर चंद्रपूर येथे लिंगायत समाज समाधी स्थळाच्या जागेवर बनणार संरक्षण भिंत

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांने मतदारसंघात मंजुर विकास कामांचे सध्या भूमिपूजन केल्या जात आहे. दरम्याण स्थानिक आमदार निधी अतंर्गत वेंडली आणि चंद्रपूर येथील लिंगायत समाज समाधी स्थळ येथे मंजुर विकास कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विधिवत भुमिपूजन करण्यात आले.

चंद्रपूर मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असुन मतदार संघातील ग्रामिण आणि शहरी भागाच्या विकासासाठी मोठा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून विकासकामांना गती मिळाली आहे. यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहे. तर अनेक कामे प्रस्तावीत आहे. दरम्याण वेंडली येथे समाज भवन बांधण्याची मागणी स्थानिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर समाज भवनासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून २० लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून वेंडली ग्रामपंचायतीच्या जागेवर तयार होत असलेल्या समाज भवनाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी वेंडलीच्या सरपंच प्रतिभा अलवलवार, उपसरपंच राजकुमार नागपूरे, संध्या पिंपळशेंडे, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामिण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, मुन्ना जोगी, जंगलु पाचभाई, संजय टोंगे, सुरेश तोतडे, प्रवीण सिंह, श्रीरंग वरारकर, रविंद्र पिंपळशेंडे यांच्यासह ग्रामस्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लिंगायत समाज समाधी स्थळाच्या जागेवर संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत सदर कामासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून १३ लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. सदर कामाचेही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, विलास वनकर, राशेद हुसेन, रमेश मुलकावार, संजय धारणे, विवेक वल्लपकर, प्रशांत मेडपिलवार, मनोहर बोक्कावार, कल्पना धारणे, भरत वाघीडे, श्रिकांत चिंतावार, सुरेश जक्कनवार, सतीश चिल्लुरे, संगिता देवांग, चंदा धारणे, अर्चना चिंतावार, वैशाली चिंतावार, विजया मुलकावार, मिना शेंडे, अर्चना डांगरे, लक्ष्मी चिंल्लोरे, एकता पिंतुलवार, राधिका वलभकर, सुनिता धारणे, जया व्यवहारे यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

advt