हिंगणघाट आय ए एम चा स्तुत्य उपक्रम!

0
581

हिंगणघाट आय ए एम चा स्तुत्य उपक्रम!

उपजिल्हा रुग्णालयात देणार कोविड रुग्णांना देणार विनामूल्य सेवा!

हिंगणघाट, अनंता वायसे : मानवतेचा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊन येथील आय एम ए या संघटनेने कोविडचे महाभयंकर संकट पाहून आपल्या खासगी रुग्णालयातून काही काळ वेगळं करून जनतेच्या सोयीसाठी व येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमी संख्या लक्षात घेता आपली विनामूल्य सेवा उपजिल्हा रुग्णालयात देण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला असून येथील हिंगणघाट आय एम ए च्या अध्यक्षा डॉ. रश्मी खिळेकर, डॉ. श्री व सौ मानधनिया, डॉ. निर्मेश कोठारी, डॉ. निशा सिघवी, डॉ. ओस्तवाल, डॉ. घोरपडे या शहरातील डॉकटरांनी उपजिल्हा रुग्णालयात आपली सेवा देण्यास प्रारंभ केलेला आहे.
आय ए एम हिंगणघाटच्या या निर्णयाने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयात असलेली डॉक्टरांची कमतरता पाहून व त्यामुळे रुग्णांची होत असलेली कुचंबणा आय ए एम च्या निर्णया मुळे बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. शासकीय आरोग्य विभागाची ढासळलेली आरोग्य यंत्रणा या आय ए एमच्या निर्णयाने थोडी फार दुरुस्त होण्याची आशा निर्माण झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here