अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी

0
517

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी

जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांची जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली मागणी

पोंभुर्णा प्रतिनिधी:- अवकाळी पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान पिकाचे नुकसान झाले आहे.त्या नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी देवाडा-केमारा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य राहुल संतोषवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत पाठवण्यात आले.

पोंभुर्णा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने धान कापलेल्या सरड्या पाण्यात पोहायला लागलेल्या आहेत.त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्याची गरज असून प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य,राहुल संतोषवार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here