बेरोजगारांना स्थानिक उद्योगांत रोजगार देण्यांसाठी मनसेचे चंद्रपूरात धरणे आंदोलन ! 

0
472

बेरोजगारांना स्थानिक उद्योगांत रोजगार देण्यांसाठी मनसेचे चंद्रपूरात धरणे आंदोलन ! 

चंद्रपूर -किरण घाटे-( वि.प्र .)

बेरोजगाराला न्याय न देता उलट मनसे पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून शासन बेरोजगारांचा आवाज दडपण्यांचा प्रयत्न करीत आहे. बेरोजगारांचा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मनसे नेते मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात गुरुवार दि.१२ ऑगस्टला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यांत आले .आजच्या घडीला चंद्रपूर जिल्ह्यातील लाखाें बेरोजगारांच्या हाताला काम नाही ते नाेकरीसाठी वणवण भटकत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते .दरम्यान आज याच पाश्वभुमिवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बेरोजगारांचे एक लाख पत्र पाठविण्यांच्या अभियानाचा आज आरंभ करण्यात आला.

 

धरणे आंदोलनात बेरोजगारांनी शासन व लोकप्रतिनिधी विरोधात जाेरदार नारेबाजी केली .स्थानिक उद्योगात नौकरी आमच्या हक्काची ती आम्हाला मिळायलाच हवी , आम्ही कधी पर्यंत बेरोजगार राहणार, लोकप्रतिनिधी सत्तेत मदमस्त असून बेरोजगार त्यांची नशा उतरविल्या शिवाय राहणार नाही. स्थानिकांना त्वरीत नौकरी मिळवून द्या, अन्यथा खूर्च्या खाली करा अश्या विविध प्रकारच्या घाेषणा करीत बेरोजगारांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्ट मंडळाने स्थानिक बेरोजगारांच्या मागण्याचे निवेदन प्रशासनाला सादर केले. स्थानिक उद्योगात शासकीय नियमाप्रमाणे अंशी टक्के स्थानिकांना नौकरी द्यावी, उद्योगात नाेकर भरती करतांना स्थानिकाचे कॅम्पस घेण्याचे बंधनकारक करावे. उद्योगातील परप्रांतिय मजुरांची पोलिस व्हेरिफिकेशन, गुन्हेगारी रेकॉर्ड, मुसाफिर ठाण्यात नोंदणीची चौकशी करावी. नियम बाह्य त्या काम करणांऱ्या परप्रातियांवर कार्यवाही करावी. उद्योगात कार्यरत कामगारांना शासकीय नियमा प्रमाणे मिनिमम वेजेस, पगार, पी.एफ., इ.एफ.आय.सी. सुवीधा, सुरक्षा साधने उपलब्ध करावी. कामगारांची आर्थिक, शारीरिक, मानसिक पिळवणूक बंद करण्यात यावी आदी मागण्या निवेदनात नमुद करण्यात आल्या हाेत्या .येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांना स्थानिक बेरोजगारांचे एक लाख पत्रे पाठवून या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. याची सुरुवात आज पासून करण्यात आली असल्याचे मनसे नेते मनदीप राेडे यांनी बाेलतांना सांगितले .

सदरहु धरणे आंदोलन चंद्रपूर मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात करण्यांत आले. या वेळी मनसे पदाधिकारी, मनसे उपजिल्हा अध्यक्ष, नगरसेवक सचिन भोयर, भरत गुप्ता, वाहतूक सेना, प्रतिमा ठाकूर, महिला शहर अध्यक्ष ,मायाताई मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष महिला, सुमित करपे, शहर सचिव बाळा चंदनवाड शहर उपाध्यक्ष अॅड. नवाज शेख शहर उपाध्यक्ष, समिर शेख, संगीत चातरक, स्वामी राऊत, नितेश जांभुळकर, राहुल मडावी अदर मिश्रा, मिथुन महाकुलकर, संदीप अरडे, नितीन बावणे, अॅड. अक्षय गेडाम, आदित्य गाजुला, आकाश केराम, सुमित खोडनकर, राकेश खोडनकर, अमोल भर, आशिष गांउतरे, अजय टेवली, सुंदर गिरी, ब्रिजनंदन माझी, रोशन बदकी, अनिल कपाटे, महेश धातरक, प्रशांत खामत, सुशील ढेडी, राम सारवा, सुरेद्र साव, अमोल साव, योगेश शेडमाके, रवी पवार, आदी शेकडो मनसे सैनिक तथा स्थानिक बेरोजगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here