कोरोनाच्या काळात जनतेच्या अडचणी मांडणाऱ्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल होणे दुर्दैवी : नरेंद्र सोनारकर
प्रतिनिधी – दुर्गापूर ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या समस्या मांडणारी बातमी एका युट्यूब चॅनल चे प्रतिनिधी गणेश इसनकर यांनी मांडली असतांना बातमी ला खोटे ठरवत संपादक राजकुमार खोब्रागडे, प्रतिनिधी गणेश इसनकर, मीना मेश्राम, रीना गेडाम, कुसुम मंगल या महिलांवर ही गुन्हा दाखल केला आहे. ही अराजकता असून मुस्कटदाबीचा हा भयंकर प्रकार असल्याने पुरोगामी पत्रकार संघ या घटनेचा तीव्र निषेध करत युट्यूब वहिनी चे प्रतिनिधी आणि जनतेवर लावलेले खोटे गुन्हे मागे घेण्याचे आवाहन केले असून प्रतिनिधी आणि महिलांवर दाखल केलेले खोटे गुंन्हे मागे घेतले नाही तर या अराजकते विरुद्ध पुरोगामी पत्रकार इतर पत्रकार संघ इतर पत्रकार संघटनांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारेल. आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील, अशी माहिती पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.