रा. काॅ. किसान सभा जिल्हा सचिव पदी :- प्रा. राजेंद्र ठाकरे

0
418

रा. काॅ. किसान सभा जिल्हा सचिव पदी :- प्रा. राजेंद्र ठाकरे

राज जुनघरे

कोठारी:- येथिल जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे व्यवसायीक तंत्र शिक्षण विभागाचे प्राध्यापक, मनमिळाऊ व्यक्ती तत्व, कला कौशल्य व गुणात्मक ऊर्जेचे धनी,असे राजेंद्र देविदास ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा, चंद्रपूर जिल्हा सचिव पदी जिल्हा किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष जगदीश जुनघरे यांनी केली आहे. ग्रामीण भागात प्राध्यापकाचे शैक्षणिक कार्य पुर्ण करित असता सामाजिक बांधिलकी जोपासत जनहिताचे कार्य त्यांनी उत्स्फूर्त पणे केले आहे. त्याच कार्याची पावती म्हणून व जिल्हा किसान सभेची पुढील वाटचाल किसान कल्याणार्थ व्हावी म्हणून राजेंद्र ठाकरे यांची जिल्हा सचिव पदाची धुरा त्यांचे खांद्यावर देण्यात आली आहे. प्रा. राजेंद्र ठाकरे किसान सभेचे सचिव पदी वरणी लागल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here