मतदार यादीत नाव नाही मग आजच करा नोंदणी

0
278

मतदार यादीत नाव नाही मग आजच करा नोंदणी

उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांचे आव्हान; नजीकच्या मतदान केंद्रावर नोंदणी सुरु

 

राजुरा : मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु असून ज्यांचे मतदार यादीत नाव नाही अश्या तालुक्यातील सर्व नागरिकांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आव्हान राजुरा उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी केले आहे.

मतदार नाव नोंदणी मोहीम दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण होत आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अश्या नागरिकांनी या मोहिमेत आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. 70- राजुरा विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या कार्यक्रमानुसार 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांचे नाव समाविष्ट करणे, मय्यत, दुबार, स्थलांतरीत नागरिकांचे नाव वगळणे इत्यादी कामे होणार आहेत. ज्याची नावे मतदार यादीत नाही अश्यांची मतदार नाव नोंदणीसाठी मोबाइल अॅप व्दारे ऑनलाईन नाव नोंदणी करता येवू शकेल, त्याचबरोबर स्थानिक क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांचेमार्फत देखील अर्ज भरता येवू शकणार असल्याचे आव्हान उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी केले आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here