ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या 

0
428
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या 
 
खासदार बाळू धानोरकर यांची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी 
 
आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन खासदार बाळू धानोरकरांनी केल्या सूचना 
चंद्रपूर : पावसामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ व उर्वरीत महाराष्ट्रात सर्वत्र शेतकरी या परिस्थितीने संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने विशेष बाब म्हणून पाऊस किती पडला याचा विचार न करता, नेहमीचे निकष न लावता केवळ शेतकरी अडचणीत आहे, याचा विचार करून सर्व शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घोषित करावा,’ अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची खासदार बाळू धानोरकर यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. ‘संपूर्ण राज्यभर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. हे मान्य करून ओला दुष्काळ जाहीर करावा. पंचनामे करण्याची औपचारिकता न करता केवळ पीक नोंदी पाहून एनडीआरएफ, एसडीआरएफच्या दराने सर्व शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घोषित करावा. त्यामुळे यंत्रणेवरील ताण कमी होईल, व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,’ असेही खासदार बाळू धानोरकर  यांनी म्हटले आहे. ‘अतिवृष्टीमुळे खरिपातील सर्व पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांचे व शेतमालाचे नुकसान झाले आहे. रोजंदारीवर रोजगार असणाऱ्या शेतमजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here