ओबीसी चे आरक्षण परत मिळावे तीव्र राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन

0
477

ओबीसी चे आरक्षण परत मिळावे तीव्र राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन

प्रतिनिधी /रविंद्र उडता

अहमदनगर/संगमनेर :- येथे दिनांक २६ जून २०२१ रोजी सकाळी १०:०० वा. संगमनेर बस स्थानक समोर तीव्र राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुणे नाशिक हायवे काही काळासाठी बंद होता व दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागली होती. याप्रसंगी बोलतांना संगमनेर भाजपा चे शहरअध्यक्ष .श्रीराम गणपुले तसेच मा.ज्ञानेश्वर कर्पे व ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस भारत गवळी यांनी महाराष्ट्र ओबीसी समाजाला पूर्ववत राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे,असे निवेदन संगमनेर पोलीस स्टेशन चे पी.आय. मुकुंद देशमुख यांना देण्यात आले यासाठी भारतीय जनता पार्टी संगमनेर तालुका तर्फे सदर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी भाजपा चे जेष्ठ नेते राम जाजू, ,नगरसेविका मेघा भगत,राजेंद्र सांगळे,डॉ महेंद्र कोल्हे,श्रीराज डेरे,बाबुराव खेमनर,योगराज परदेशी,दिपेश ताटकर,अमोल रनाते,शाम कोळपकर,वैभव लाडगे,गोरक्ष कापकर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here