झरी जामणी भाजपा च्या वतीने पाटण येथे चक्काजाम आंदोलन

0
583

झरी जामणी भाजपा च्या वतीने पाटण येथे चक्काजाम आंदोलन

ओबीसी च्या आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन.

Impact 24 news
तालुका प्रतिनिधी
पुरुषोत्तम गेडाम
यवतमाळ / झरी जामणी
मो.9763808163

आज दिनाक २६ जून २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ पाटण येथे झरी जामणी भाजपाच्या वतीने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी मुकुटबन-आदिलाबाद रोडवर मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन रद्द झालेले ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी करण्यात आले.यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही मागे हटणार नाही,अशी ठाम भूमिका भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतली.यावेळी (तालुका अध्यक्ष भाजपा) सतीश नाकले,(झरी पं.स.सभापती) राजेश्वर गोंड्रावार, (झरी महिला अध्यक्ष भाजपा) प्रियाताई भोयर,(उपसभापती) लताताई आत्राम,(जि.प.सदस्य) संगीता मानकर,(जि.प.सदस्य) मीनाक्षी बोलेनवार,अशोक बोदकूरवार, मुन्ना बोलेनवार,सुरेश मानकर,सतीश दासरवार,राम आईटवार,अनिल पावडे,अनिल पोटे,प्रवीण नोमुलवार,अमोल मुत्यालवार,श्याम बोदकूरवार,अंकुश लेंडे,संजय दातारकर,महेश बाडलवार, भुमारेड्डी पाटकुरवार,सचिन दुम्मनवार,प्रविण चुक्कलवार, मधुभाऊ राजुरकर,बाळुभाऊ चेडे, कुश कमेकर,गजानन आकुलवार,किशोर नेल्लावार, किशोर पाईलवार,अनिल कुंटावार व सर्व झरी जामणी तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here