शहरातील रामदेव बाबा ले आउट मध्ये स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने वृक्षारोपण

0
595

शहरातील रामदेव बाबा ले आउट मध्ये स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने वृक्षारोपण

पांढरकवडा तालुका प्रतिनिधी
गुरूबचनसींग जुनी

दिनाक २६/६/२०२१
पांढरकवडा शहरातील रामदेव बाबा वसाहत मध्ये नगर परिषद पांढरकवडा यांच्या सौजन्याने संपूर्ण वसाहत मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आज करण्यात आला या कार्यक्रमाकरिता नगर परिषदेचे उपाध्यक्ष काझी सरफराझोद्दीन, मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार, आरोग्य निरीक्षक संतोष व्यास, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, बेलदार समाजाचे नेते मधुकर कुर्मावार, भाजप नेते सुरेश बोलेनवार, दलित समाजाचे नेते भाऊराव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वृक्षारोपण चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये विठोबाजी भोयर यांनी विकास कामे मागील पंधरा वर्षापासून होत नसल्या कारणाने वसाहत मध्ये नाल्या, दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात यावे याबाबतचे त्यांनी मुख्य अधिकारी यांना कळविले आहे. नगरपरिषदेने वृक्षरोपण करण्याकरिता झाडे वृक्ष ट्री गार्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरपरिषदेचे आभार माजी नगरसेवक अंकित नैताम यांनी मानला आहे वसाहत मधले प्रमुख या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अविनाश आलुरवार, अरुण येल्लटीवार विष्णू अंकतवार, विनोद रामटेके संतोष अन्नमवार अनिल भोयरविठ्ठल अलचेवार विनोद उग गेवार जय मुनोत रविंद्र जिडडेवार अनिल कोपुलवार इंस्तरि मेडपलावार व इतर वसाहत मधील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here