समाजातील ख-या गरजू महिलांना मदतीचा हात यंग चांदा बिग्रेडने दिला -आमदार किशाेर जाेरगेवार

0
445

समाजातील ख-या गरजू महिलांना मदतीचा हात यंग चांदा बिग्रेडने दिला -आमदार किशाेर जाेरगेवार

किरण घाटे

समाजातील गरजू महिलांना मदतीचा हात देण्यांचे काम विदर्भातील सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रकमी असणां-या चंद्रपूर शहरातील यंग चांदा ब्रिगेडने केले आहे .ख-या अर्थाने ही संस्था महिलांच्या सन्मानसाठी लढणारी एक संघटना असल्याचे मत चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार यांनी व्यक्त केले .ते भाऊबीज निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूरात आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन बाेलत हाेते .आज ही समाजात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी हाेण्यां ऐवजी ते अधिक वाढत चालले आहे.          त्या अत्याचाराचा विरोध करण्यांसाठी कुठेही एकजुटीने लढतांना दिसत नाही. उलट मुकाट्यांने हा अन्याय सहन करीत आहे .ही बाब अत्यंत चिंताजनक व खेदाची असुन आता ही परिस्थिती बदलायला हवी .त्या बाबतीत समाजातील महिलांनी सारासार विचार करावा असेही आमदार जाेरगेवार पुढे म्हणाले .काेराेना संकटाचे सर्व नियम काटेकाेरपणे पाळत यंग चांदा ब्रिगेडचा( !बहिन भावांचे अतुट नाते जाेपसणारा!)भाऊबीज हा कार्यक्रम नुकताच पार पडला .या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्या तथा शहरातील सुपरिचीत यंग चांदा ब्रिगेडच्या मुख्य संघटिका वंदना हातगावकर , दुर्गा वैरागडे , कल्पना शिंदे , अल्का राखुंडे कविता शुक्ला , संगिता गायधने व इत्तर महिला पदाधिकारी तसेच यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संस्थेच्या सदस्या माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या .चंद्रपूर शहरातील इत्तरही काही वार्डात भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले असुन शहरातील महिलांकडुन या कार्यक्रमांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here