झोपडपट्टी वासीयांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया पँथर सेनेचे डरकाळी आंदोलन

0
411

झोपडपट्टी वासीयांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया पँथर सेनेचे डरकाळी आंदोलन

■ जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चंदूबाबा मठ नगरीत राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याकरीता व बंगाली कँम्प परिसरातील निळा ध्वजाची नियोजीत जागा शांतीदुत परिवर्तन मंडळाच्या नावाने करुन ध्वजावरुन जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विकृतावर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया पँथर सेनेचे डरकाळी आंदोलन करण्यात आले.

मौजा दुर्गापूर ग्रामपंचायत अंतर्गत चंदूबाबा मठ नगरी गेल्या सात वर्षांपासून आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन मिळेल ते काम करुन लहान लहान झोपड्या बांधून राहत आहेत. गेल्या सात वर्षापासून दुर्गापूर ग्रामपंचायत प्रशासनाकडे आपल्याला संविधानिक मुलभूत गरजा मिळाव्या म्हणून अनेकदा निवेदने देऊन न्यायीक मागण्या मागत आहेत. परंतु येथील ग्रामपंचायत प्रशासन या झोपडपट्टी वासीयांच्या मागण्या कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून त्यांना न्यायापासून दूर ठेवले जात आहे. या झोपडपट्टी परिसरात जंगली वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. तिथे विजेची व्यवस्था नसल्याने अंधारात साप, विंचवाच्या सानिध्यात व जंगली प्राण्यांच्या दहशतीत जिवन जगत आहेत.
मात्र येथील मुजोर ग्रामपंचायत प्रशासनाने अजूपर्यंत या झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना माणसंच समजत नसून त्यांना विज, पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या, गटारे, व भौतिक सुविधा पासून दूर ठेवल्या जात आहे. त्यांना त्यांच्या हक्काची गृहनोंद ग्रामपंचायत दप्तरात करण्यास गेल्या सात वर्षापासून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे तेथील ग्रामपंचायत सरपंच व सचिवांना तात्काळ निलंबित करावे. बंगाली कँप फुकटनगर परिसरात मागील पंधरा वर्षापासून निळा झेंडा आहे. त्या ठिकाणी समाजबाधंवाच्या सामाजिक भावना जुळलेल्या आहेत. परंतु तेथील काही विकृत मानसीकतेच्या माधमामातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून नाहक विरोध केल्या जात आहे. त्यामुळे निळा झेंड्याची नियोजित जागा तात्काळ शांतीदुत परिवर्तन मंडळाच्या नावाने करुन विकृति विरोधात तात्काळ फौजदारी कारवाई करून त्या ठिकाणी समाजबाधंवाना सुरक्षा प्रदान करावी. करीता ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून आज डरकाळी धरणा आंदोलन करण्यात आले. वरील सर्व रास्त मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात याव्या अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून भविष्यात या विषयाला घेऊन तिव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई उर्फ प्रविण देठेकर, जिल्हा सल्लागार संतोषजी डांगे, जिल्हा मार्गदर्शक सुरेश नारनवरे,जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, निशाल मेश्राम, माजी नगरसेवक राजेश उके, सुमेध मुरमाडकर, राजु भगत, भैयाजी मानकर, पपीता जुनघरे, सारिका उराडे, कल्पना अलौने, सिद्धार्थ मुंजेवार, बंडू वासनिक, विनोद ठमके,. विनोद ठमके, सुखदेव रामटेके, लिला बावने, सरिता मुंजेवार, अर्चना राउत, मनिषा बोंदरे, संजना चांदेकर, भारती भैसारे, हेमलता वासनिक, आरती खोब्रागडे आदी असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here