राजुरा शहरातील जनता कर्फ्यू ला उलगुलान संघटनेचा तीव्र विरोध

0
369

राजुरा शहरातील जनता कर्फ्यू ला उलगुलान संघटनेचा तीव्र विरोध

राजुरा शहरात दिनांक १६/९/२०२० ते २०/९/२०२० पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय हा पूर्णपणे एकतर्फी असून याबाबत जनतेला कोणतीही पूर्वसूचना न देता व जनतेला विश्वासात न घेता जबरदस्तीने लादलेला आहे असा आरोप उलगुलान संघटना शाखा राजुरा च्या वतीने करण्यात आला. अशा या प्रशासनाच्या तुघलकी निर्णयाचा राजुरा शहरवासी यांच्यातर्फे उलगुलान संघटना जाहीर निषेध करते.

सदर जनता कर्फ्यू हा सामान्य जनता, छोटे व्यापारी, हातठेले व हातावर आणून पोटावर खाणारे कामगार यांच्या जीवावर उठणारा असून या निर्णयामुळे पुन्हा सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची पाळी येणार आहे. कोरोना महामारी दूर करण्यासाठी जनता कर्फ्यू हाच उपाय आहे का? असा प्रश्न आज राजुरा शहरातील सर्वसामान्य जनता प्रशासनाला विचारत आहे. आधीच सर्वसामान्य जनता आर्थिक प्रपंचात सापडलेली असून जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच जनता कर्फ्यूने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. याबाबत राजुरा शहरातील जनतेचे मत विचारात न घेता प्रशासन मनमानी कारभार करत आहे. कोरोना संकटकाळात प्रशासनाने ज्याप्रमाणात पावले उचलायला पाहिजे होती ते न करता सर्वसामान्य जनतेवर जनता कर्फ्यू लादून काय साध्य करणार आहे. अशा या एकतर्फी निर्णयाचा राजुरा शहरवासियांना कडून व उलगुलान संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिश मानकर , पुरूषोत्तम नळे, श्रिधर रावला, राजु काटम, साहील झोडे, संघपाल देठे, अश्विन मावलिकर व अन्य कार्यकर्ता द्वारा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here