अंगणवाडी सेविकांचे कार्य कौतुकास्पद – नगराध्यक्षा योगीताताई पिपरे

0
428

अंगणवाडी सेविकांचे कार्य कौतुकास्पद – नगराध्यक्षा योगीताताई पिपरे

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर – गडचिरोली येथे पोषण अभियान सप्ताह कार्यक्रम

गडचिरोली, सुखसागर झाडे

मुलांचे आरोग्य जपण्यासाठी पोषण आहारासोबत अंगणवाडीची स्वच्छता तसेच आहारातील घटक या बाबीही महत्वाच्या आहेत अंगणवाडी सेविका मदतनिस या प्रत्येक घराघरात पोहोचुन सेवा पुरविण्याचे मोलाचे काम करीत आहेत. म्हणून अंगणवाडी सेविका यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांनी केले.

 

महिला व बालविकास विभाग- बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) गडचिरोली यांच्या पुढाकारातून पोषण अभियान सप्ताह सुरु आहे. या सप्ताह दरम्यान आज कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथे पोषण आहार कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष बोलत होत्या. मुल सुदृढ जन्माला यावे याकरिता महिलांनी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या तसेच वनभाज्या यांचा जास्तीत-जास्त सेवन करावा ज्यांच्यामुळे शरीराला आवश्यक पोषक जीवनसत्वे मिळतील व बाळ सुदृढ जन्माला येईल. असे नगराध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना म्हटले.

 

 

यावेळी शहरातील प्रत्येक अंगनवाडी सेविकांनी हिरव्या पालेभाज्या व वनभाज्या यापासून वेगवेगळे पोषक पदार्थ बनवुन त्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे, विषय विशेषज्ञ (गृहविभाग) नीलिमा पाटील, नगरसेविका वैष्णवी नैताम, अंगणवाडी सेविका कल्पना मेश्राम व शहरातील सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here