बार्शी नाका जिजाऊ चौक ते उंबरे कोठा रस्ता होणे गरजेचे, नगर परिषद मुख्याधिका-यांना निवेदन सादर

0
556

बार्शी नाका जिजाऊ चौक ते उंबरे कोठा रस्ता होणे गरजेचे, नगर परिषद मुख्याधिका-यांना निवेदन सादर

उस्मानाबाद, किरण घाटे वि.प्र. शहरातील बार्शी नाका जिजाऊ चौक ते उंबरे कोठा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहरातील रस्ते नाल्यांची जबाबदारी नगर पालिकेची असुन शहरातील वाढते अतिक्रमण
दुरावस्थेतील रस्ते नाल्या म्हणजे नगर पालिकेचे अकार्यक्षमतेचे दर्शन होय! लहुजी चौक ते सावित्रीबाई फुले सोसायटी रस्ता, भिमनगर न.प. शाळा क्रं ९ ते कपिल धरा,जाधव वाडी रस्ता, शासकीय रुग्णालय ते वैराग नाका फकिरा चौक रस्ता हे देखिल रस्ते अति महत्त्वाचे असुन प्रलंबित आहेत. मोजमाप झालेल्या रस्त्यावर स्थानिक रहिवाश्यांनी अतिक्रमण केले आहे. रस्त्याला मंजुरी दिल्यानंतर त्याचे काम तात्काळ होणे फार गरजेचे आहे.

 

अशा दुरावस्थेतील रस्त्यावरुन जाणे येणे करतांना गरोदर माता, वयोवृद्ध व इतर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बार्शी नाका जिजाऊ चौक ते उंबरे कोठा रस्ता पुर्ण होण्यासाठी अभिजीत पतंगे आमरण उपोषण करीत आहेत. त्यांची ही मागणी रास्त असून नागरिकांच्या हितासाठी ते उपोषणाच्या मार्गातुन न्याय मागत आहेत. याबाबत त्यांना अनेकांकडुन पाठिंबा देण्यात येत आहे. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी या रस्त्याचे काम मार्गी लावुन अभिजीत पतंगे व त्यांच्या सहकाऱ्यांना उपोषणापासुन परावृत्त करावे अशी मागणी एका लेखी निवेदनातुन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांना केली असुन याची एक प्रत जिल्हाधिकारी कोस्तुभ दिवेगावकर यांना नुकतीच दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here