विदेशी दारूची वाहतूक करणारे दोन आरोपी ताब्यात, ३ लाख ७३ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
426

विदेशी दारूची वाहतूक करणारे दोन आरोपी ताब्यात, ३ लाख ७३ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर/प्रतिनिधी (८ जून) : पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार आज रामनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोन आरोपींसह विदेशी दारूची वाहतूक करणारी कार ताब्यात घेतली.
सविस्तर वृत्त असे की, ह्युंडाई ईऑन या वाहनात विदेशी दारूची वाहतूक नागपूर रोडमार्गे चंद्रपूर शहरात करण्यात येत होती. या मुखबीराकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलीस निरीक्षक कमलेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारून झडती घेतली असता ६ बाक्स मॉक्डवेल नं १, एक बॉक्स स्टलिंग रिझर्व्ह बी ७ व एक बॉक्स रॉयल स्टॅन डिलक्स व्हिस्कीचा तसेच दोन मोबाईल फोन, वाहतूक करणारी ह्युंडाई ईऑन कार (एमएच ३४ एएम ३४७९) असा एकूण रुपये ३,७३,६०० चा मुद्देमाल ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग चंद्रपूर व पोलीस निरीक्षक कमलेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन राजगुरू, पोहवा राजू आसुटकर, पोलीस नाईक राजनारायन ठाकूर आणि पोशी योगेश सोनवणे यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलेश जयस्वाल करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here