शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीत प्राथमिक शिक्षिका समिराबेगम मोहम्मद वसीम यांचे उल्लेखनीय यश

0
446

अकोला जिल्हा प्रतिनिधी( ✍🏻 मुकेश हातोले ) पातुर : आलेगाव येथील रहिवासी व अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू मुले या शाळेतील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षिका समिराबेगम मोहम्मद वसीम यांनी उर्दू माध्यमाच्या इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले शैक्षणिक व्हिडीओ सोशल मिडीयातून विद्यार्थी – पालक – शिक्षकांच्या ग्रूपवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. कोरोना संकट काळात शाळा बंद असल्या तरी त्यांच्या यु ट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून राज्यातील तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी हे शैक्षणिक व्हिडिओ पाहून अभ्यास केला आहे.

येथील शेवगाव उर्दू मुले शाळेतील तंत्रस्नेही शिक्षिका समिराबेगम मोहम्मद वसीम यांनी सुमारे दोन वर्षांपुर्वी उर्दू एज्युकेशनल व्हिडियो या यू-ट्यूब चॅनलच्या मदतीने शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीला प्रारंभ केला होता. शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीचे राज्याचे मार्गदर्शक भुषण कुलकर्णी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांनीही मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

शिक्षिका समिराबेगम यांनी इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमातील सर्व विषयांतील धड्यांवर उत्कृष्ट असे शैक्षणिक व्हिडीओ तयार करून ते त्यांच्या यु ट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहेत. त्यांच्या यु ट्यूब चॅनेलला आतापर्यंत सुमारे तीन लाखाहून अधिक व्हियू तसेच १० हजार सबक्रायर्स मिळाले आहेत. यावरून कोरोना लॉकडाऊन काळात त्यांच्या शैक्षणिक व्हिडीओंचा उर्दू माध्यमातील शेवगाव तालुका, जिल्हा व राज्यातील तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्हिडीओंचा अभ्यासाठी वापर केला आहे. काही व्हिडीओ मराठी व इंग्रजी माध्यमातूनही तयार केल्याचे शिक्षिका समिराबेगम यांनी सांगीतले. या यशाबद्दल आमदार रणधीरदादा सावरकर,आमदार नितीनजी देशमुख,शिक्षक नेते जव्वाद हूसेन,सुभाष जैन,जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here