घुग्घुस येथील मुस्लिम बांधव समाजातर्फे ना. वडेट्टीवार यांच्या सत्कार

0
243

घुग्घुस येथील मुस्लिम बांधव समाजातर्फे ना. वडेट्टीवार यांच्या सत्कार

घुग्घुस काँग्रेसतर्फे येथील प्रमोद महाजन मंचावर महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी ना. विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात घुग्घुस येथील मुस्लिम बांधव समाजातर्फे ना. विजय वडेट्टीवार यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे पाहुणे म्हणुन सरचिटनिस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तथा अध्यक्षा विजय क्रांती संघटना शिवानी वडेट्टीवार, माजी चंद्रपूर काँग्रेस कमेटी (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जेष्ठ नेते विनायक बांगडे उपस्थित होते.

यावेळी मुस्लिम बांधव समाज घुग्घुसचे अलीमभाई शेख, जावेद सिद्दीकी, जावेद कुरैशी, फिरोजभाई, शहजाद शेख, मोसिम भाई, रफीक भाई, भैया भाई, अकबर भाई, सलमान, सैदू भाई, अफजल भाई व समाज बांधव तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here