धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्यात ते उतरले धोतर सोडुन त्यांनी मासे पकडले

0
722

धरणाच्या ओव्हरफ्लो पाण्यात ते उतरले

 

धोतर सोडुन त्यांनी मासे पकडले

कोरपणा: आलेल्या संधीचा फायदा कोण कसा घेईल, हे सांगताच येत नाही. आता हेच बघा ना, संततधार पावसाने ओव्हरफ्लो झालेल्या धरणातून मासे पकडण्याची संधी अनेकांनी साधली. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पकडीगुड़म धारण ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लो सुरु होताच गावातील व परिसरातील नागरिकांनी मासोळ्या पकडण्यासाठी सांडव्यावर एकच गर्दी केली. काहींनी तर अंगावरील धोतर सोडून त्याची जाळी केली आणि मासे पकडले. ज्यांना मासे मिळाले, त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड ते दोन क्विंटल मासोळी पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज आहेत. एकीकडे पावसाने आणि पुराने जनजीवन विस्कळीत आहे, तर दुसरीकडे त्याच अतिवृष्टीचा फायदा घेतला जात असल्याची विसंगती यानिमित्ताने बघायला मिळाली. सध्या या सामूहिक मासेमारीचा व्हीडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here