‘सायेब आमाले प्याहाचा पाणी तरी नेयमी पेहू ध्याहा जी…’ अतिसंवेदनशील मारदा ग्रामस्थ नागरीकांची हाक

0
440

‘सायेब आमाले प्याहाचा पाणी तरी नेयमी पेहू ध्याहा जी…’ अतिसंवेदनशील मारदा ग्रामस्थ नागरीकांची हाक

सरकारने जिल्ह्यातील प्रत्येक गावात सौर ऊर्जा वर चालणारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी : आमदार होळी

प्रतिनिधी/गडचिरोली – विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी मतदार संघातील विविध गावात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व सर्वसामान्य गोरगरीब जनते सोबत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बाबत तक्रार केली व सांगितले आमच्या जंगल पहाडी भागात दररोज विजेचा लपंडाव सुरू असतो. विद्युत प्रवाह केंव्हा सुरू होईल सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा केंव्हा सुरू होईल सांगता येत नाही. स्थानिक महिलांना खूप लांब-दुरून पिण्याचे पाणी आणावे लागते. यामुळे जीवघेणा त्रास सहन करावा लागतो. ‘सायेब आमाले प्याहा चा पाणी तरी नेयमी पेहु ध्याहा जी…’ हे शब्द होते गडचिरोली विधानसभा मतदार संघातील अतिसंवेदनशील मारदा येथील ग्रामस्थ नागरिक यांचे!
ही सत्य वास्तविकता आहे. अतिसंवेदनशील डोंगर दऱ्या खोऱ्यात वसलेल्या अनेक गावात आज विद्युत पोहचली आहे. परंतु काही उपयोग नाही कारण येथील विजेचा लपंडाव दररोजचा पोरखेळ होऊन बसला आहे. या अवस्थेत येथील गोरगरीब जनतेसाठी सौर ऊर्जा वर चालणारी उपकरणे हीच पर्याय ठरतात या बद्दल आमदार डॉ देवराव होळी यांनी राज्य सरकार कडे तमाम गावात सौर ऊर्जा तंत्रज्ञान वर चालणारी पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. तसे नियोजन केले आहे निदान स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी नियमित पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघातील तमाम गावात ग्रामपंचायत निहाय व्यवस्था नियोजन आराखडा तयार करण्यात आले आहे व सरकारने निधी दिल्यास सदर योजना कार्यान्वित करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी गडचिरोली पंचायत समितीचे सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास पाटील दशमुखे, पंचायत समितीचे सदस्य नेताजी गावतूरे, मालता ताई मडावी, भाजपा गडचिरोली तालुका महामंत्री हेमंत पाटील बोरकुटे, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here