लकवाग्रस्त हरी शेंडेला लोकसहभागातून मदतीचा आधार

0
590

लकवाग्रस्त हरी शेंडेला लोकसहभागातून मदतीचा आधार

शेतकरी संघटनेचा पुढाकार

 

कोरपना, प्रवीण मेश्राम

मोडकळीस आलेले घर, दोन मुली व पत्नीची जबाबदारी असलेल्या गडचांदूर येथील हरी शेंडे (वय ५५ वर्षे) यांना नुकतेच लकवा आजाराने ग्रासले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने औषधोपचार व वैद्यकीय तपासणीत अनेक अडचणी येत आहेत. दरम्यान हरी शेंडे यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून शेतकरी संघटनेच्या माध्यमाने लोकसहभागातून निधी गोळा करण्यात आला.

 

 

सदरची रक्कम हरी शेंडे यांच्या कुटुंबीयांना प्रविण गुंडावार, ॲड. दीपक चटप, संतोष पटकोटवार, नागोजी गोवारदिपे यांनी सुपूर्त केली. गडचांदूर येथील विलास धांडे, प्रविण गुंडावार, ॲड. दीपक चटप, संतोष पटकोटवार, ख्वाजा, मुमताज भाई, वासुदेव गौरकार, दिलीप आस्वले, प्रवीण एकरे, मनोहर सातपुते, गुणवंत खोके, नागोबाजी गोवारदिपे, डॉ. के.आर. भोयर, डॉ. जयदीप चटप, शैलेश विरुटकर, महादेव नागभिडकर, ज्ञानेश्वर अवताडे आदींनी आर्थिक सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here