वणीतील महिलांनी केली आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी…

0
735

वणीतील महिलांनी केली आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी…

वणी, मनोज नवले
मुंबईतील साकीनाका परीसरात घडलेली अत्यंत निंदनीय घटना एका 34 वर्षीय महिलेवर मोहन चौहान या 45 वर्षीय नरामध्याने पाशवी बलात्कार करून तिच्या गुप्तांगात सळाकीने वार केले .मृत्युशी झुंजत तिने जगाचा निरोप घेतला.

 

 

या घटनेची दखल घेत धनोजे कुणबी महीला विकास आघाडी च्या वतीने निवेदन देण्यात आले. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी उपविभागीय अधीकारी शरद जावळे, खासदार बाळू धानोरकर ,आमदार संजीवरेड्डी बोदकूरवर तसेच भद्रावती वरोरा क्षेत्राच्या आमदार प्रतीभा धानोरकर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

 

 

यावेळी धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्षा किरण देरकर, साधना गोहोकार,वंदना आवारी, अर्चना बोदाडकर, कविता चटकी, साधना मत्ते, मिनाक्षी देरकर, संध्या बोबडे, कांचन देरकर, वर्षा देठे, किरण पिपराळे इत्यादी महीला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here