बॅलेटने निवडणूक झाल्यास भाजपचा पराभव निश्चित

0
460
बॅलेटने निवडणूक झाल्यास भाजपचा पराभव निश्चित
 
खासदार बाळू धानोरकर; पंतप्रधान मोदींना हरविण्याची ताकद महाविकास आघाडीत
चंद्रपूर : देशातील सार्वत्रिक निवडणुका या इव्हीएम मशीने घेतल्या जातात. मात्र, या मशीनवर सर्वसामान्य मतदारांपासून अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पदवीधर मतदार संघात बॅलेट पेपरवर निवडणूक झाली. त्यात भाजपचा सूपडा साफ झाला. जनतेच्या मनात कोण हे बॅलेटतून स्पष्ट झाले. त्यामुळे येत्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरने घेतल्या गेल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा वाराणसीतून हरविण्याची ताकद महाविकास आघाडीत असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.
नागपूर पदवीधर मतदार संघातून भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव करीत काँग्रेसचे अ‍ॅड. अभिजित वंजारी विजयी झाले. या ऐतिहासिक विजयामुळे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकत्र्यांमध्ये उत्साह आहे. या विजयाचा आनंदोत्सव वरोरा येथे साजरा करण्यात आला. यावेळी खासदार बाळू धानोरकर बोलत होते.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, मिलिंद भोयर, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी विलास टिपले, शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी डॉ. खापने, विलास नेरकर, मनोहर स्वामी, सभापती कृ . उ. बा. समिती वरोरा राजू चिकटे, देवानंद मोरे, उपसभापती कृ. उ. बा. समिती वरोरा देवानंद मोरे, शुभम चिमुरकर, सन्नी गुप्ता, शशी चौधरी, राहुल देवाळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, त्यासोबतच या निवडणुकीच्या निकालांनी आणखी एक गोष्ट अधोरेखित केली ती म्हणजे बॅलेट पेपर मतदान. महाविकास आघाडी सरकारने यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या सर्वच निवडणूक या ईव्हीएम द्वारे न घेता बॅलेट पेपर मतदार पद्धतीचा अवलंब करून घ्यावा.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि. भाजपच्या ५८ वर्ष राखलेला गडाला भगदाड पाडून अभिजित वंजारी यांनी इतिहास रचला. पदवीधर मतदार संघाचे प्रश्नांची त्यांना जण आहे. ते जमिनीवरचे व्येक्ती असून योग्य उमेदवाराला पदवीधर मतदारांनी निवडून दिले आहे. पुढे देखील महाविकास आघाडीच्या असाच विजय होत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here