समूह शाळा, दत्तक शाळा योजना, पदभरतीच्या कंत्राटीकरणाचे निर्णय रद्द करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

0
294

समूह शाळा, दत्तक शाळा योजना, पदभरतीच्या कंत्राटीकरणाचे निर्णय रद्द करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी


चंद्रपूर : कमी पटसंख्येच्या सरकारी शाळा बंद करून त्या ठिकाणी समूह शाळा विकसित करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशावर वंचित बहुजन युवा आघाडी संतापली आहे. सरकारने ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील 20 पेक्षा कमी पटसंख्याच्या शाळा सुरू ठेवून त्या ठिकाणी अधिक पायाभूत आणि इतर सुविधा पुराव्यात, त्यांना बंद करू नये अन्यथा आंदोलन करून हा निर्णय मोडीत काढू असा इशारा वंचीत बहुजन युवा आघाडी ने दिला. सर्वांना पदवी पर्यंतचे शिक्षणं मोफत मिळावे अशी मागणी आम्ही सरकारकडे करीत असताना सरकार आणि प्रशासन गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण हिरावून घेत आहे. शाळा आणि महाविद्यालयात शिक्षकाची शेकडो पदे रिक्त असून ते भरण्याऐवजी सरकारचा भर बाह्य यंत्रणेमार्फत पदभरती करण्यावर आहे. शाळांना कंपन्याकडे दत्तक देण्याऐवजी आमदार, खासदार मंत्र्यांना कंपन्याकडे दत्तक द्या. शिक्षणासाठी पैसे खर्च करण्याची सरकारची जबाबदारी असताना ते टाळण्यासाठीच दत्तक योजना पुढे आणली आहे हा शाळा खासगीकरणाचा सरकारचा डाव आहे. त्यामुळे ग्रामीण,आदिवासी, दुर्गम,गरीब विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या डाव शिंदे-फडणवीस, पवार चे महायुती सरकार करत आहे. जवळपास 15 हजार शाळा बंद होण्याचा मार्गावर आहे. आणि 65 हजार शाळाचे खासगीकरण करणार आहे.
राज्य सरकारने कंत्राटी भरतीसाठी एकूण नऊ एजन्सीची पाच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षानुवर्षी स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यानंतर कंत्राटी नोकरी मिळणार असल्याने उमेदवार नैराश्यात आहेत. तर यामुळे आर्थिक आणि सामाजिक दरी वाढणार आहे. कंत्राटी नोकरी नंतर पुढे काय असा प्रश्न बेरोजगारापुढे काही वर्षांनी निर्माण होईल.बाह्ययंत्रणे कडून नोकर भरतीचा निर्णय अन्यायकारक आहे. या निर्णयाद्वारे याला मुदतवाढ दिल्याने बेरोजगारा मध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करून फक्त कायम असणाऱ्या पदाची सरकारी नोकर भरती करावी. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल. अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत पुणेकर, जिल्हा सचिव छोटू दहेकर, सदस्य किरण राजूरकर, नितेश जूनघरे शहर महासचिव हर्शवर्धन कोठरकर, शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ गणवीर, अक्षय लोहकरे, भोजराज दुबे, राहुल माशतकर, राहुल वनकर, प्रणित तोडे, प्रणय मडावी आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here