सापडलेली सोन्याची अंगठी केली परत.

0
521

घडले माणुसकीचे दर्शन.

सापडलेली सोन्याची अंगठी केली परत.

स्वतंत्र्य दिनी त्याच्या प्रामाणिकतेचा सत्कार.

गडचांदूर/प्रतिनिधी – प्रवीण मेश्राम

वर्तमान काळात एकीकडे पैशासाठी माणुस माणसाचे गळे कापायलाही मागेपुढे पाहात नाही तर दुसरीकडे माणूसकी अजुनही जिवंत असल्याचे पहायला मिळत आहे.याचे जिवंत उदाहरण कोरपना येथे अनुभवता आले.येथील एका हामालाने त्याला सापडलेली सोन्याची अंगठी मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.
सविस्तर असे की,चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी शांताराम देरकर यांच्या हातातील सोन्याची अंगठी हरवली होती.बरीच शोधाशोध करून ही ती सापडली नाही.लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंदीच्या काळात अंदाजे 55 ते 60 हजारांचा फटका बसल्याची खंत मनात थोडीफार होती.याच शहरात हमाली करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा फैजू बेग यांना रस्त्यावर सोन्याची अंगठी सापडली.याची माहिती त्यांनी आपल्या मित्राला दिली.दरम्यान देरकर यांची अंगठी हरवल्याची माहिती फैजूला कळली असता लगेच त्यांनी प्रामाणिकता दाखवत देरकर यांचे दुकान गाठले आणि अंगठी बद्दल माहिती घेतली असता अंगठी हरवल्याची खात्री त्याला पटली.लगेच त्यांनी विचारले “ही अंगठी तुमची आहे का” ? तेव्हा देरकर यांचे पुत्र सुनील यांनी ओळखून आमचीच आहे हरवली होती असे उत्तर दिले आणि फैजूने अंगठी त्यांना परत दिली.फैजूच्या या इमानदारी वरून कळते की जगात आजही प्रमाणिकपणा जिवंत आहे.स्वतंत्र्य दिनी देरकर परिवाराकडून जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष तथा माजी सभापती सैय्यद आबीद अली यांच्या हस्ते रोख दहा हजार रुपये व शाल श्रीफळ देऊन फैजूचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाजार समिती सचिव कवडू देरकर व कर्मचारी तसेच अॅड.श्रीनिवास मुसळे.अॅड.मोहितकर,माजी सभापती भारत चन्ने,अनील रेगुंडवार,नगरसेवक सुभाष तुराणकार,अमोल आसेकर,उल्माले बाबु,बालू पानघाटे इत्यादींची उपस्थिती होती.फैजु बेगचा प्रमाणीकपणा व देरकर परिवाराकडून देण्यात आलेली भेट वस्तु व सत्कार सदैव जनतेच्या आठवणीत राहील हे मात्र विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here