दि १६ आगस्ट ला शहिद दिन सोहळा निमित्त विविध कार्यक्रम
चिमूर

भारतीय स्वातंत्र लढ्यातील चिमूर क्रांतीभूमीतील अमर शहिदाना नमन करण्यासाठीचा कार्यक्रम दि १६ आगस्ट ला शहिद दिन सोहळा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर ,खासदार अशोक नेते आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या उपस्थितीत होत आहे .
शहीद दिन सोहळा कार्यक्रमात स्वातंत्रसैनिकांच्या कुटूंबियांचा सत्कार करणे, श्रीराम मंदिर अयोध्या मधील कारसेवकांचा सत्कार करणे , एसएससी व एचएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे ,रक्तदान शिबिराचे आयोजन असून कार्यक्रम दि १६ आगस्ट सकाळी ११ वा भांगडीया वाडा जुनी महाराष्ट्र बँक येथे आयोजित केलेला आहे
या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर ,खासदार अशोक नेते ,माजी आमदार मितेशजी भांगडीया ,आमदार बंटीभाऊ भांगडीया , जीप उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर भाजप जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
शहीद दिन सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रम समितीचे वतीने करण्यात येत आहे .