अकोल्यात मंदिरातील दानपेट्यावर डल्ला मारणारे २ चोरटे गजाआड…!

0
486

अकोल्यात मंदिरातील दानपेट्यावर डल्ला मारणारे २ चोरटे गजाआड…!

● एक चोरटा फरार…   ●अकोले पोलिसांचे यश

अहमदनगर
संगमनेर (प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील) १९/९/२०२१ :
अकोले तालुक्यात मंदिरातील दानपेटीवर डोळा ठेवून भाविकांनी श्रध्देने केलेल्या दाना वर डल्ला मारण्याच्या घटना घडत होत्या, सातत्याने होणार्‍या या घटनांमुळे पोलिसही चक्रावून गेले होते अखेर अकोले तालुक्यातील देवालयातील मंदिराच्या दानपेटीतील भाविकांच्या दानावर डल्ला मारणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले तर एक आरोपी फरार झाला आहे.

 

संगमनेर तालुक्यातील ही अनेक मंदिराच्या पेट्या मागील काही महिन्यात फोडल्या असल्याने ,या ही मंदिराची यांच्या कडून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस स्टेशन चे सहायक निरीक्षक मिथुन घुगे व त्यांचे सहकारी पोलीस गस्त घालत असताना दिनांक 13.09.2021 रोजी रात्री 11.00 वा. चे सुमारास प्रवरा नदीच्या पलीकडे, रस्त्याचे कडेला, महालक्ष्मी मंदिरात 3 इसमांची संशयीत रित्या हालचाल लक्षात आली.

 

पोलीस व काही नागरिक यांनी संशयितांना पकडले त्यातील 2 संशयित इसमांना ताब्यात घेतले तर एक इसम अंधाराचा फायदा घेवुन पसार झाला. हे संशयित मच्छिंद्र पांडुरंग मेंगाळ ,राजु ठमा मेंगाळ दोघे रा उंचखडक खु॥ ता अकोले जि अ.नगर असे या आरोपींचे नाव असून त्यांचा तिसरा सहकारी विलास लक्ष्मण गावंडे हा फरार आहे. त्यांचे कडुन चोरीत वापरलेले साहित्य,कटावणी,ग्रॅण्डर,रोख रक्कम व मोटार सायकल हे साहित्य जप्त करण्यात आले असुन त्यांचे विरुदध अकोले पोलीस स्टेशनला गुरनं 352/2021 भा.द.वि. कलम 379,511 प्रमाणे दाखल केला.

 

 

आरोपींना न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.पोलीस कस्टडी रिमांड कालावधीत अटक आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी मंदिर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
1)गुरनं 352/2021 भा.द.वि. कलम 379,511 प्रमाणे मधील महालक्ष्मी माता मंदिर अकोले
2)गुरनं 356/2021 भा.द.वि कलम 457,380 प्रमाणे दत्त मंदिर रुंभोडी ता अकोले जि अ. नगर
3)गुरनं 354/2021 भा.द.वि कलम 457,380 प्रमाणे अंबिका माता मंदिर गणोरे ता अकोले जि अ.नगर
4) गुरनं 306/2021 भा.द.वि 457,380 कलम प्रमाणे आंबाबाई मंदिर टाहाकरी ता अकोले जि अ. नगर
अशा प्रमाणे मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यांचे घरझडती मध्ये त्यांचे कब्जातुन 2 मोटार सायकल, 1 एमप्ली फायर, दोन सांऊड,1 दानपेटी, ग्रॅण्डर मशिन, लोंखडी कटावण्या वरोख रक्कम व इतर साहित्य असा एकुण 80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

 

फरार आरोपी विलास लक्ष्मण गावंडे रा उंचखडक खु ता अकोले जि अ.नगर याचा शोध सुरु आहे नागरिकांना आपले गावात किंवा परिसरात कोठेही संशयीत रित्या व्यक्ती दिसुन आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवा तसेच चोरी करणाऱ्या टोळी बाबत काही एक माहिती असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here