जिवती तालुक्यातील शेनगाव येथील शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश

0
587

जिवती तालुक्यातील शेनगाव येथील शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश

 

जिवती, प्रवीण मेश्राम : तालुक्यांतील शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश घेतला खा. शरद पवार यांच्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मजबुती करणासाठी आज शेनगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अनेक युवकांनी प्रवेश घेतला. या पक्ष कार्यक्रमांमध्ये राजुरा विधानसभा महासचिव अरुण निमजे, कोरपना तालुका अध्यक्ष गडचांदूर नगरपालिका उपाध्यक्ष शरद जोगी, जिल्हा महासचिव रफिक निजामी यांच्या मार्गदर्शनाखाली शेनगाव येथे अनेक युवकांनी प्रवेश घेतला.

 

पक्ष मजबुतीसाठी या युवकांनी दुपट्टा आपला खांदा घेऊन पुन्हा पक्ष मोठा वाढवण्यात येणार आणि राष्ट्रवादी की जय अशा घोषणा देत दुपट्टा लाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिवती तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष मजबुतीसाठी सहभाग दर्शवला. यात सरब उद्दीन शेख, अहमद शेख, मुबारक बेग, हसन शेख, जहीर सय्यद, अखिल शेख, आफताब शेख, अस्पक सय्यद, मोहम्मद शेख, जाफर शेख शफी शेख, दशरथ गोटमुकले, अरमान सय्यद, ताजिम बेग, सचिन गोटमुकले, नौशाद शेख, जावेद पठाण, मिथुन जाधव, महादेव लिंगडे, राजकुमार पवार, मधुकर वाघमारे, संतोष जाधव, श्याम जाधव, समीर सय्यद, इस्माईल सय्यद, प्रकाश गोटमुकले इत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here