वणीच्या दहा तरूण तरुणींची जम्मू काश्मिर येथे होणाऱ्या सब ज्युनियर व ज्युनियर क्रिकेट चॉम्पीयन्सशिप करिता निवड

0
530

वणीच्या दहा तरूण तरुणींची जम्मू काश्मिर येथे होणाऱ्या सब ज्युनियर व ज्युनियर क्रिकेट चॉम्पीयन्सशिप करिता निवड

वणी (यवतमाळ), मनोज नवले : वणी हे कलागुणांच माहेर घर आहे, असं म्हटलं जात. तालुक्यातील गुणी व होतकरू तरुण तरुणींनी अनेक क्षेत्रात उंच भरार्या घेऊन या शहराला नावलौकिक मिळऊन दिलं आहे. अनेक गुणवंतांनी या शहराचं नाव साता समुद्रापार पोहचवलं आहे. अनेक किर्तिमान व्यक्तिमत्व या शहराने घडविले आहे. कला व क्रिडा क्षेत्रात जिद्द व चिकाटीने तालुक्यातील तरुणांनी राज्यात व राज्याबाहेर आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. हाच वारसा जोपसत शहरातील आणखी दहा तरुणांनी क्रिडा क्षेत्रात मेहनत, जिद्द व चिकाटीनं स्वत:चं अस्तित्व निर्माण करुन जम्मू काश्मिर येथे होणाऱ्या ज्युनियर क्रिकेट चॉम्पीयन्सशिप मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. जी.पी. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन वणीच्या दहा तरूण तरुणींची जम्मू काश्मिर येथे होणाऱ्या सब ज्युनियर व ज्युनियर क्रिकेट चॉम्पीयन्सशिप करिता निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल या सर्व खेळाडूंचा ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्याकडून सत्कारही करण्यात आला आहे. या सर्व खेळाडूंनी क्रिडा क्षेत्रात उंच भरारी घेत तालुक्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. क्रिकेट प्रतियोगीतेकरीता निवड झालेले सर्व खेळाडू 20 सप्टेंबरला जम्मू काश्मिर कडे रवाना होणार आहेत.

 

 

सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या तालुक्याने अनेक नामवंत व्यक्ती घडविले आहे. गुणी व होतकरू व्यक्तींनी आपल्या जिद्द व चिकाटीने नावारुपास येऊन तालुक्याला एक वेगळीच ओळख निर्माण करुन दिली आहे. क्रिडा क्षेत्रातही अनेकांनी नाव कमवुन तालुक्याची मान उंचावीली आहे. तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे अनेक होतकरू व्यक्ती येथे निपजले आहेत. क्रिडा क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करुन देशात तालुक्याच नाव उंचावणाऱ्या खेळाडूंमध्ये तालुक्यातील आणखी दहा खेळाडूंनी भर घातली आहे. क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळात रुचकता दाखविणाऱ्या व जिद्दीने या खेळात स्वताला झोकून देणाऱ्या 10 तरूण तरुणींची रास्ट्रीय स्तरावरिल क्रिकेट प्रतियोगीतेकरीता निवड झाली आहे. जी.पी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन वणीचे हे विद्यार्थी आहेत. वयोगट 16 चे चार तर वयोगट 19 च्या सहा विद्यार्थ्यांची या प्रतियोगीतेकरीता निवड झाली आहे. या सर्वांचा ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी पुराणिक, चेतन उलमाले, अभिषेक नैताम, कुणाल वरारकर, समिर शेख़, रेहान अली, क्रिश राऊत, रोहित मुनघाटे, आर्यन भगत, साहिल पाल यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना जी.पी. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम जिवने, उपाध्यक्ष अविनाश उईके, सचिव प्रितेश लोनारे यांचे योग्य मार्गदर्शन लाभले असून या सर्वांनी या खेळाडूंच्या पुढील यशस्वी वाटचाली करिता त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here