विजय माळाळेची प्राणज्याेत मालवली!

0
638

विजय माळाळेची प्राणज्याेत मालवली!
उस्मानाबाद, किरण घाटे : उस्मानबाद तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अंशकालीन म्हणुन काम करणारे, सदैव सर्वसामान्यसाठी धडपडणारे -बौध्दाचार्य विजय माळाळे यांचे आज शनिवार दि. २४ एप्रिल रोजी कोरोनामुळे स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान दु:खद निधन झाले. जनतेला निराधार, दिव्यांग, यांच्या सह इतर विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवुन देणारे जनसेवक म्हणुन ते या भागात परिचित होते. त्यांच्याकडे कामासाठी जाणारा प्रत्येक माणुस निराश होत नव्हता. घरातील मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडिल, तिन भाऊ त्यांची पत्नी मुले असा एकत्रीत कुटुंब परिवार आहे. सद्या परिस्थितीत त्यांचे सर्व कुटुंब कोरोना पाॅजिटिव्ह असुन शासकीय रुग्णालय व कोरोना सेंटर मध्ये त्यांच्यावरती उपचार सुरु असल्याचे समजते. बौध्द शमशान भुमीत त्यांच्यावरती शासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय माळाळे यांच्या निधनाची बातमी फेसबुक, वाॅटसअॅप व इतर माध्यमातुन पसरली असता शहरात हळहळ व्यक्त होत आहे. बिगविशम ग्रुप व समाजबांधवा तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गणेश रानबा वाघमारे, संजय बिटु माळाळे, शशी माने, महेश सरवदे, विनोद सरवदे, राजेंद्र बनसोडे, शिवलिंग लोंढे यांनी विजय मळाळे यांचे दुख:द निधनाबाबत दुखवटा व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here