घुग्घुस शहरात दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

0
188

घुग्घुस शहरात दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

विशेष प्रतिनिधी / पंकज रामटेके
घुग्घुस येथील दि.२६ व २७ जानेवारी २०२४ या दोन दिवसीय भव्य संमेलन बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या वर्धापन दिनानिमित्त्य विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर येथे बौद्ध सर्कल समिती घुग्घुस व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले.

पहिल्या दिवशी दि. २६ जानेवारी शुक्रवार सकाळला धम्म सम्मेलनाचे उद्घाटन औरंगाबादचे पूज्यनीय भंते करुणानंद थेरो यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती पूज्यनीय भंते धम्मानंद, धम्मबोधी थेरो, श्रध्दारक्खित, संघरतन, रत्नमणी थेरो यांची उपस्थिती प्रामुख्याने राहणार आहे.

त्यानंतर भारतीय संविधाना समोरील आव्हाने, उपाययोजना याविषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक, आदिलाबाद (तेलंगाना) मा. मधुकरराव बावलकर, प्रमुख वक्ते फुले शाहु आंबेडकरी विचारवंत ब्रम्हपुरीचे प्रा. संजय मगर राहणार आहेत.

यावेळी विशेष अतिथी चंद्रपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार, प्रमुख पाहुणे नगर परिषद घुग्घुस मुख्याधिकारी डॉ. जितेंद्र गादेवार, महाप्रबंधक वेकोली वणी क्षेत्र आभासचंद्र सिंह, घुग्घुस पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, सेंट थाॅमस चर्च पास्टर रेव्ह. मार्कोस खांडेकर, अध्यक्ष गुरुद्वारा कमेटी सरदार संम्मत सिंह दारी, इंदिरा गांधी महाविद्यालय संचालिका शहनाज पठान, सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष मधुकर मालेकर यांची उपस्थित राहणार आहे.

त्यानंतर सांयकाळ ४ ते ६ वाजेपर्यंत जागतिकीकरणाच्या युगात बौध्दांच्या स्वतंत्र अर्थव्यवस्थेची आवश्यकता विषयावर परिसंवाद ठेवण्यात आले आहे. या परिसंवादाचे मुख्य मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मा. डाॅ. राजरत्न अशोकराव आंबेडकर राहणार असून प्रमुख उपस्थिती राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक विजय बंसोड, संचालक आवाज इंडिया टि.व्ही. चॅनेलचे अमन कांबळे, प्रबुद्ध युवा इंटरनॅशनल फोरम भद्रावतीचे नाना देवगडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यानंतर सांयकाळी ६ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा यांच्या संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवशी २७ जानेवारी शनिवार रोजी पहिला सत्रात दुपार १२:३० वाजता भारतीय संविधान-स्त्रियांच्या सर्वांगिण उत्थानाचा मार्ग या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचे अध्यक्ष आंबेडकरी विचारवंत अमरावतीचे डाॅ. वामन गवई तर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर हायकोर्ट ॲड. स्मिताताई ताकसांडे, ॲड. अंजलीताई साळवे, प्रा. सिमाताई मेश्राम (मोरे), नंदाताई तायवाडे या उपस्थित राहणार आहे. दुपारी ४ वाजता दुसऱ्या सत्रात युवकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग व आंबेडकरी चळवळीमध्ये युवकाची भुमिका या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अ.डा.टा. प्लानिंग मुंबईचे डाॅ. ललीत खोब्रागडे, प्रमुख पाहुणे म्हनुन डाॅ. आं.बि.स्कु. फाउडंर नागपूरचे पवन मेश्राम यांनी मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर सांय.६ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भिमशाहिर साहेबराव येरेकर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. असे घुग्घुस बौद्ध सर्कल समितीचे अध्यक्ष भिमेंद्र कांबळे यांनी घुग्घुस पत्रपरिषद घेवुन कळविले आहे.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत असुन घुग्घुस व परिसरातील सर्व समाज बांधवांना जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समितीतर्फे करण्यात आले आहे.

यावेळी अशोक रामटेके, श्याम कुमरवार, देवानंद सुटे, दिप्तीताई सोनटक्के, योगीता मुन, सविताताई मंडपे, उर्मिला लिहितकर,भारत साळवे, अनिरुद्ध आवळे, पियांशु कोवले, दिपक कांबळे, अमित बोरकर, सुमित पाटील व सचिन वैरागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here