शेजारनिच्या वादाला कंटाळून महिलेने घेतले विष
जिवती पोलीस स्टेशन परिसरात घडली घटना
विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर: पोलीस स्टेशन परिसरात महिलेने विष पिऊन आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात जिवती येथे घडली असून शेजारणीच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल तिने उचलले अशी प्रतिक्रिया तिने प्रसार माध्यमांशी बोलताना संगीतले आहे
सविस्तर वृत्त असे आहे की शेनगाव येथील रहिवासी असलेली परवीन वय २३ वर्ष असे आहे . गेल्या दोन वर्षा पासून त्यांचा व शेजारांचा वाद होता. दिनांक ०८ ला ते पोलीस स्टेशन जिवती येथे तक्रार दाखल केली परंतु घरी परतल्या नंतर आणखी वाद झाल्याने परत पोलीस स्टेशन गाठले असता शेजारांशी पोलीस स्टेशन च्या परिसरात वाद झाल्याने शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तिने पोलीस स्टेशन परिसरात स्वतःजवळ असलेले उंदरांचे विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांच्या सतर्कतेणें महिलेला ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे हलविले महिलेचा उपचार जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे चालू असून महिलेची प्रकृती स्थिर आहे .
काही दिवसांपूर्वी मी य दारूचा व्यवसाय करीत होते काल काही प्रसार माध्यमामांध्ये बातम्या प्रकाशित झाला त्या मध्ये दिलेली प्रतिक्रिया चुकीची आहे मला पोलीस विभागाने पैशाची मागणी केलेली नाही पोलिसांच्या मदतीने माझी पत्नी बचावली
रामा गोटमवार महिलेचे पती
काल पोलीस स्टेशन जिवती येथे महिला तक्रार देण्यास आल्या होत्या त्यांनी शेजारच्या वादाला कंटाळून अचानक स्वतःजवळ असलेलं उंदीर मारण्याचे औषद घेतले आहे पुढील तपास पोलीस स्टेशन चे ठाणेदार संतोष अंबिके करीत आहे
सुशीलकुमार नायक
उपविभागीय पोलिस अधिकारी गडचांदुर