व्हेंटिलेटर, हाय फ्लो ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांना जिएसटी व आयात शुल्कात सुट दया – आ. किशोर जोरगेवार

0
597

व्हेंटिलेटर, हाय फ्लो ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांना जिएसटी व आयात शुल्कात सुट दया – आ. किशोर जोरगेवार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना मागणी

चंद्रपूर, प्रतिनिधी : कोरोनाच्या गंभिर रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटीलेटरची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र त्यावर लावण्यात येणा-या जिएसटी व आयात शुल्कामूळे याची किंमत अधिक वाढत आहे. त्यामूळे कोरोना काळात अत्यावश्यक असलेल्या व्हेंटिलेटर, हाय फ्लो ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांना जिएसटीत सूट देत आयात शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे.
कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा कमी होत आहे. परिणामी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या उपकरणांअभावी अनेक गंभिर स्वरुपाच्या रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. त्यामूळे कोरोनाचा प्रकोप आणि उपकरणांची कमतरता लक्षात घेता प्राण वाचवणारे व्हेंटिलेटर, हाय फ्लो ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांना जीएसटीमधून सूट देत यातील आयात शुल्क कमी केल्यास त्यांची खरेदी किमत कमी होईल आणि खासगी रुग्णालये व समर्पित कोविड हॉस्पिटल यांना स्वस्त दरात सदर उपकरणे सहज खरेदी करणे शक्य होणार. परिणामी त्याचा फायदा रुग्णांना होईल. रुग्णांना व्हेंटिलेटर, उच्च प्रवाह ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणा करिता भटकावे लागणार नाही. असे सदर पत्राच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून व्हेंटिलेटर, हाय फ्लो ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांना जिएसटी व आयात शुल्कात सुट देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here