युवा सामाजिक कार्यकर्ते चंदन इंगोले यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त

0
494

युवा सामाजिक कार्यकर्ते चंदन इंगोले यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त

विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोगा मार्फत यवतमाळ जिल्ह्याचे निवासी युवा सामाजिक कार्यकर्ते चंदन संतोष इंगोले यांना दिनांक २१/०६/२०२१ रोजी मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोगा मार्फत समाज कार्यामध्ये मानद डॉक्टरेट पदवी मिळविणारे महाराष्ट्रातील पाहिले व्यक्ती आहे. चंदन इंगोले हे मूळचे महाराष्ट्रातील उमरी पठार तहसील आर्णी जिल्हा यवतमाळ या छोट्याश्या खेड्यातील रहिवासी असून ते गेल्या ८ वर्षापासून समाजाच्या विविध घटका मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. चंदन इंगोले हे समाजसेवेने वेढलेल्या उमरी पठार ता. आर्णी जी. यवतमाळ या गावातील शेतकरी पुत्र असून ते सध्या उत्तर प्रदेश मध्ये सरकारी बँक मध्ये कृषि अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कृषि पदवी प्राप्त करून व्यवस्थापन यामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जनसंवाद आणि पत्रकारिता मध्ये शिक्षण घेऊन बळीराजा या मासिकामध्ये उपसंपादक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्या नंतर कृषि अधिकारी म्हणून कार्यरत असताना कायद्याचे शिक्षण पूर्ण केले व सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामजिक सेवेमध्ये पूर्णतः वाहून घेतले.महिला आणि बालविकास, बेघर झालेल्या मुलांचे शिक्षण, निराधारांना आधार, ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची धडपड, बेरोजगारांसाठी रोजगार संधी निर्माण कार्यासाठी आवश्यक त्या उपायोजना, मानवाधिकारराची लढाई इत्यादी अनेक विषयावर कामे केलीत. सगळी कार्य ही एक वयक्तिक जबाबदारी समजून केले. सामाजिक काम ही विश्व मानवाधिकार आयोग, अंतरराष्ट्रिय बोध्ध शिक्षा संस्थान उत्तर प्रदेश, कलर्स फाउंडेशन उमरी पठार महाराष्ट्र, ऑल बुधिस्ट वेल्फेअर असोसिएशन दिल्ही, युथ अँक्शन कमिटी उत्तराखंड, वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड, व्हिएतनाम बुद्धिस्ट संघ, विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग इत्यादी व ईतर आंतरराष्ट्रीय संघटना मध्ये महत्त्वाची जबाबदारी पर पाडत आहेत. आंतररा्ट्रिय संमेलनामध्ये थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये भारतीय प्रतिनिधी म्हणून सामजिक समता, विश्व बंधुता व मानवाधिकारासाठी आपली भूमिका मांडली. या सर्व बाबींची दाखल घेऊन विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग यांनी युवा सामाजिक कार्यकर्ते श्री चंदन संतोष इंगोले उमरी पठार, ता. आर्णी जी. यवतमाळ यांना २१/०६/२०२१ ला E-convocation द्वारे मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी मिळालेली डॉक्टरेट पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आई-वडील आणि असंख्य सामाजिक कार्यकर्ते जे समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र मेहनत करत आहेत त्यांना समर्पित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here