विध्यार्थी साखळीतुन साकारले “मेरा भारत महान”

0
518

विध्यार्थी साखळीतुन साकारले “मेरा भारत महान”

आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी केली हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती

 

 

राजुरा 10 ऑगस्ट

बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील विध्यार्थीनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विद्यार्थी साखळी च्या माध्यमातून “मेरा भारत महान” हे शब्द लेखन करून हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती केली. आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना( इको क्लब ), स्काऊट – गाईड, कब – बुलबुल व इतर विध्यार्थीनी मिळून बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट लीडर तसेच रुपेश चिडे यांच्या मार्गदर्शनात, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, वैशाली टिपले, सुनीता कोरडे, वैशाली चिमूरकर, नवनाथ बुटले, विकास बावणे, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व पर्यावरण संवर्धणाची आवड निर्माण व्हावी तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक, समाजसुधारक, राष्ट्र प्रेमींची माहिती विध्यार्थीना मिळावी या करिता आदर्श शाळेत विविध उपक्रम राबाविले जात आहेत. चित्रकला, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, श्रमदान व स्वच्छता अभियान, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या करिता शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका व विध्यार्थीचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here