गोंडपिंपरीच्या आदर्श मास्टेने सर केले माऊंट पतालुस पर्वतशिखर.* *जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी भेट घेऊन थोपटली पाठ

0
392

*गोंडपिंपरीच्या आदर्श मास्टेने सर केले माऊंट पतालुस पर्वतशिखर.*
_________________________________

*जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी भेट घेऊन थोपटली पाठ!*

शनिवार, दि. ११ डिसेंबर.
जिल्ह्यातील दुर्गम भागातून येणार्‍या गोंडपिपरी तालुक्यातील कु. आदर्श साईनाथ मास्टे या विद्यार्थ्यानी जगातील सर्वाधिक उंचीचे म्हणून ओळखले जाणारे एवरेस्ट पर्वतशिखरातील पतालुस सर करून चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या कामगिरीचे कौतुक स्वतः पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी याआधी केले होते.
आदर्श हा तोहोगाव येथील स्व. बाजीराव मून उच्च माध्यमिक आश्रमशाळेमध्ये बारावीत शिक्षण घेत आहे.
गोंडपिंपरीसारख्या अतिदुर्गम भागात राहणार्‍या या पोराने उंच भरारी घेत जिल्ह्याचे नाव रोशन केल्याने त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. यामध्ये काल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी आदर्शच्या घरी जावून त्याचे व त्याच्या कौटुंबिंयाचे अभिनंदन केले. आणि पुढील उत्तरोत्तर देदीप्यमान कामगिरीसाठी आदर्शला शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांसमवेत, बंडू नर्मलवार,भाजपचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, साईनाथ मास्टे, राकेश पुन, मारोती झाडे, न. पं. सभापती चेतन गौर, माजी उपसभापती मनीष वासमवार, गणपती चौधरी, नाना येल्लेवार, गणेश उदाडे, अनिल झाडे यांसह आदि मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here