छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य भारत आयोजित दुर्गराज रायगड किल्ला साफसफाई स्वच्छता मोहीम

0
802

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य भारत आयोजित दुर्गराज रायगड किल्ला साफसफाई स्वच्छता मोहीम यशस्वी संपन्न

उस्मानाबाद -अमोल मुसळे

मो-9405608508

छत्रपती शासन महाराष्ट्र राज्य आयोजित गड किल्ले स्वच्छता मोहीम क्र. 12 रायगड या येथे यशस्वी संपन्न झाली.आजपर्यंत च्या मोहिमा.. विसापूर, लोहगड, कोरीगड, पन्हाळगड , रामशेज, साल्हेर , मुल्हेर , तोरणा गड , कुलाबा, खर्डा, शिवनेरी ,रायगड दिनांक 4जुलै रोजी पार पडली.

यावेळी गडाच्या पायऱ्याची स्वच्छता, गडावरील राजदरबार परिसरातील गवत काढले, पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या वेगवेगळ्या ठिकाणी कचरा वर्गीकरण करून, गडावरील स्वच्छता मोहीम सर्व मावळ्यांनी यशस्वी केली.

यावेळी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष प्राणजीत गवंडी बोलताना म्हणाले की छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप गेली अनेक वर्षापासून गडकिल्ले साफसफाई स्वच्छता मोहीम राबवत आहे. यावर्षी दुर्गराज रायगड किल्ला साफसफाई स्वच्छता मोहीम गड परिसरात 51 वृक्षारोपण केले आहे यशस्वी करण्यासाठी 100 शिवशंभूभक्तांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता केली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी एकच सदिच्छा व्यक्त करतो की सध्या मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळाले पाहिजे.

यावेळी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी,दादासाहेब तनपुरे, शरद मिस्कीन,सचिन नागणे ,जिवन सांगडे, प्रदिप जगताप, नागेश बाबर ,बालाजी बारबोले , राजेंद्र वीर, बाळासाहेब थिटे ,दादा नलवडे , अशोक रदवे, अतुल कदम, समाधान सुंतार ,दादा नलवडे,खंडु लोकरे, गणेश गरदाडे, ज्ञानेश्वर भागडे, रामेश्वर भागडे, समाधान हिवरे , ओंकार जाधव, किरण सांगडे, सचिन जाधव,ओम नलवडे, बालाजी मोरे, शुभम वेदपाठक शिवाजी बिडवे, डिगाबर बागल, दादा गुंड, अक्षय निंबाळकर, आबा लोमटे, यासह 100 शिवशंभूभक्त सहभागी झाले .

शेवटी महेश भाऊ कदम यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या शिवभक्तांचे आभार मानले.या बद्दल सर्व शिवभक्तांकडून छत्रपती शासन ग्रुपचे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here