वनी बेलखेडा येथे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात आला

0
629

वनी बेलखेडा येथे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात आला

तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे

अमरावती/चांदूर बाजार (कृष्णापुर):- राज्यमंत्री तसेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांचा 5 जुलै रोजी वाढदिवसा निमित्ताने ग्रामपंचायत वनी बेलखेडा व प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे प्रहारचे जेष्ठ नेते मंगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील विधवा व गरजू महिलांना साडी व पातळ वाटप करण्यात आले होते.ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण करण्यात आले. गावातील भाजी विक्रेत्यांना प्रफुल नवघरे यांच्या मदतीने प्रहार छत्रीचे वाटप सुद्धा करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये गरजू लोकांचा विमा काढून देण्यात आला. तसेच गरीब गरजूंना घरांवर टिन पत्रे वाटप करण्यात आली. नोंदणी झालेल्या कामगारांना पेटी वाटप करण्यात आल्या. विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काही गोरगरीब जनतेचे अडलेल्या कामांची दखल घेण्यात आली. यावेळी प्रहार युवा कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी ब्राह्मणवाडा थडी येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार दीपक वळवी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच आरती अ राऊत, उपसरपंच अशोकराव अलोने,सदस्य अवधूत नव्हाळे, अनुपमा ठाकरे, निता मेश्राम, व प्रहार कार्यकर्ते प्रफुल नवघरे, सुरेश अलोने, माजी उपसरपंच जैनुल सौदागर, अविनाश ठाकरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी प्रहार युवा कार्यकर्ते सुनील मोहोड, अमोल शेळके, अमोल ठाकरे, अतुल राऊत, भैया राऊत, सुनील शेळके, अंकुश नागझीरकर,मुकेश अलोने, विशाल पाटील,आदित्य ठाकरे ,अजय गावंडे, ऋषिकेश चव्हाण, अतुल ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला गजानन ठाकरे, राजाभाऊ पाटील, विनायक नाईक, अजीम सौदागर, रवींद्र दाते, प्रफुल फुले, रणधीर बागडे, तसेच गावातील अन्य नागरिक उपस्थित होते. करोणा प्रतिबंध नियमांचे पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here