बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यांची परवानगी द्या!

0
305

बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यांची परवानगी द्या!

शहर मनसेने व आदिवासी बांधवांनी केली शासनाकडे मागणी

अमोल राऊत

चंद्रपूर : बिरसा मुंडा यांचा पुर्णाक्रूती पुतळा उभारण्यांसाठी महाराष्ट्र शासनाने नाहरकत प्रमाणपत्र व बांधकाम करण्यांस रितसर परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रकमी असणारे यूवा नेता तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे शहर अध्यक्ष मनदिप राेडे यांनी चंद्रपूर -आर्णी क्षेत्राचे खासदार बाळा उर्फ सुरेश धानाेरकर तथा चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे निवेदने सादर करुन केली आहे . शहरातील बंगाली कँम्प परिसरातील रेल्वे स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणां-या मुख्य मार्गावरील चाैकात हा पुतळा उभारण्यांचा आदिवासी बांधवांचा संकल्प असल्याचे मनदिप राेडे यांनी आज बाेलतांना सांगितले. चंद्रपूर शहर हे गाेंड राजांनी वसवले शहर असुन त्याची आठवण व आेळख जपणे हे आवश्यक आहे. गाेंड समाजाचे दैवत विर पुरुष यांच्या नावाने एखादी वस्तूची ओळख ठेवल्यास गोंड राजाचा इतिहास स्मरणात राहणार असुन चंद्रपूर महानगरपालिकेने ३१ जुलै २०१८ च्या सर्व साधारण सभेत जिल्हाधिकारी कार्यालय व रेल्वे स्थानक यांना जोडणांऱ्या चौकास बिरसा मुंडा चौक असे नामकरण केले आहे व तसा नाम फलकही लावण्यात आला आहे. या चौकाचे आदिवासी समाजातर्फे उद्घाटनही पार पडले असुन या चौकात आता बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पूतळा उभारण्यात यावा अशी आदिवासी बांधवाची भावना आहे. सदरहु स्मारक लोकवर्गणीतून निर्माण करण्यात येणार आहे. याबाबत आदिवासी समाज तथा क्रॉ .नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्था, चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु असुन आदिवासी समाजाच्या लोकभावना लक्षात घेता हा पुतळा उभारण्यांची व त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यांची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यांत आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here