चाकलपेठ ते चामोर्शी रत्याची दुरुस्ती करून वाहतुकीस मार्ग सोयीस्कर करा

0
467

चाकलपेठ ते चामोर्शी रत्याची दुरुस्ती करून वाहतुकीस मार्ग सोयीस्कर करा

युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी यांची आमदार . डॉ . होळीकडे निवेदनातून मागणी

: चाकलपेठ ते चामोर्शी रत्याची दुरुस्ती करून वाहतुकीस मार्ग सोयीस्कर करावा यासाठी युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी यांनी गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ . देवराव होळी यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे . चाकलपेठ ते चामोर्शी या मार्गावर खड्डेच खड्डे पडून रस्त्याची दैनावस्था झालेली आहे . मूल – चामोर्शीला जोडणारा मुख्य मार्ग असताना या मार्गावर पडलेले खडे व रस्त्याची अवस्था ही ये – जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडचण ठरत आहे . तसेच पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून राहते , अशा परिस्थितीत वाहतूक करणे जिकरीचे होते . या मुख्य मार्गावर रहदारीचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरू शकतात . याची दखल घेत निवेदनातून युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी यांनी आमदार डॉ . देवरावजी होळी यांना रत्याची दुरुस्ती करून वाहतुकीस मार्ग सोयीस्कर करावा अशी मागणी केली आहे . यावेळी युवा संकल्प संस्था शाखा चामोर्शी च्या वतीने चामोशी प्रमुख सुरज नैताम , उपप्रमुख प्रशांत चुदरी , सदस्य विक्की बारसागडे आणि ज्ञानेश्वर लटारे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here