अबब…! चक्क पेट्रोल पंपा मधून निघाले पाणी

0
531

अबब…! चक्क पेट्रोल पंपा मधून निघाले पाणी

गडचिरोली : मूल रोड वर स्थित एच पी कंपनीचे पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंप वर नागरिक आपल्या गाडीत पेट्रोल भरायला गेले असता गाडीत पेट्रोल न येता निघालं चक्क पाणी…!

यामुळे नागरिक चांगलेच संतापून पंपावर जाऊन पंप मालकाकडे तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार बूक मागत होते. तसेच या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करीत होते. परंतु पेट्रोल पंप चे मालक पिपरे यांनी कोणालाही तक्रार बूक दिले नाही. तक्रार बुक व व्हिडीओ चित्रीकरण रोखण्यासाठी पंप मालक नागरीकांच्या व पत्रकाराच्या अंगावर जाऊन कोणीही व्हिडिओ करायच नाही म्हणून रोष दाखवीत होते.

जिल्हाधिकारी गडचिरोली यांना फोन द्वारे ही कळविण्यात आले होते. अशा पेट्रोल मुळे नागरिकांच्या वाहनाचे नुकसान होत असून आर्थिक लूट केल्या जात असल्याचे दिसून आले. हि बाब स्थानिक नागरिक व पत्रकारांनी उजेडात आणली. मात्र पंप मालकांकडून दडपशाही दाखविण्यात आल्याने नागरिकांत चांगलाच संताप दिसून आला. या पेट्रोल पंपला ताबडतोब बंद करण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली येथिल नागरिकांतुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here