दहेगाव खुर्द येथे रेशनच्या स्वतः धान्याचे वाटप

0
472

दहेगाव खुर्द येथे रेशनच्या स्वतः धान्याचे वाटप

 

जालना जिल्हा प्रतिनिधी✍🏻राजेंद्र गायकवाड

जालना ः जालना अंबड तालुक्यातील दहेगाव खुर्द येथे आज रेशनच्या गहू 3 रुपये प्रति किलो तर तांदळाचे 2 प्रति किलो या दराने वाटप करण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की आज दिनांक 14/6/2021 रोज दहेगाव खुर्द येथे राज्य शासनाने दिलेल्या रेशनच्या धान्याचे वाटप करण्यात आले. रेशन दुकानदार रामेश्र्वर औटी यांनी स्वतः हजार राहून सर्व गावकऱ्यांनी रेशनच्या मालाची योग्य पद्धतीने कोरोना चे नियम पाळून वाटप करण्यात आले. या वेळी गावातील बाबासाहेब चव्हाण, वसंत जाधव, दिलिपराव जाधव, सचिन लहामगे, अरूण जाधव, संतोष भाकड, राजेंद्र भाकड, राजेंद्र जाधव आदी गावकऱ्यांनी याचा लाभ घेऊन वाटपाला सहकार्य केले. तर भरत भापकर, ओम राखुंडे, सतिश औटी यांनी धान्य मोजून गावकऱ्यांना दिले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here